‘याला आता थेट घरी पाठवा..!’धावा काढण्यात सतत अपयशी ठरणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलवर भडकले आरसीबीचे चाहते, नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद; रोहित शर्मा-दिनेश कार्तिक यांच्या विक्रमाशी केली बरोबर…!

0
2
'याला आता थेट घरी पाठवा..!'धावा काढण्यात सतत अपयशी ठरणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलवर भडकले आरसीबीचे चाहते, नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद; रोहित शर्मा-दिनेश कार्तिक यांच्या विक्रमाशी केली बरोबर...!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

ग्लेन मॅक्सवेल: इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 25व्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने आरसीबीचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबी साठी ग्लेन मॅक्सवेल या सामन्यात दमदार कामगिरी करू शकला नाही. तो शून्य धाव संख्येवर माघारी परतला. मॅक्सवेलच्या या खराब कामगिरीमुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेचा भडीमार उठवला.

4852

आयपीएल 2024 मध्ये ग्लेन मॅक्सवेल याला आपली छाप सोडता आली नाही. तो एकेक धावांसाठी संघर्ष करतोय. त्याला धावा करणे अवघड झाले आहे. आतापर्यंत एकही मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध तो केवळ चार चेंडू खेळत एकही धाव काढू शकला नाही. यासह तो आयपीएलमध्ये सर्वाधिक 17 वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम केला. त्याने रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल हे प्रत्येकी 17 वेळा शून्य धावसंख्येवर बाद झाले आहेत.

आयपीएल 2024 मध्ये ग्लेन मॅक्सवेलने आतापर्यंतच्या सामन्यात 0, 3, 28, 0, 1, 0 अशा धावा केल्या आहेत. यंदाच्या आयपीएल मध्ये आतापर्यंत त्याने 6 सामन्यात केवळ 32 धावा केल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. मॅक्सवेलने आयपीएल मध्ये आतापर्यंत 130 सामने खेळले असून त्यात 2751 धावा केल्या आहेत ज्यात 18 अर्धशतकांचा समावेश आहे. आरसीबीने त्याला ऑकशन मध्ये 14.25 कोटी रुपये देऊन खरेदी केले होते.

'याला आता थेट घरी पाठवा..!'धावा काढण्यात सतत अपयशी ठरणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलवर भडकले आरसीबीचे चाहते, नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद; रोहित शर्मा-दिनेश कार्तिक यांच्या विक्रमाशी केली बरोबर...!

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या खेळाडूंची यादी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here