विराट कोहली, शार्दुल ठाकूरनंतर गोल्ड मेडल मिळवणारा तिसरा खेळाडू कोण? पहा बीसीसीआयने व्हिडिओ केलाय शेअर

0
17
ad

विराट कोहली, शार्दुल ठाकूरनंतर गोल्ड मेडल मिळवणारा तिसरा खेळाडू कोण? पहा बीसीसीआयने व्हिडिओ केलाय शेअर


अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. या विजयांमध्ये फलंदाज आणि गोलंदाजासह क्षेत्ररक्षकांचे देखील महत्त्वाची भूमिका होती. टीम इंडियाकडून सामन्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला गोल्ड मेडल दिले जाते.

पहिल्या दोन सामन्यात दोन उत्तम क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना गोल्ड मेडल देण्यात आले. पहिल्या सामन्यात विराट कोहलीला तर दुसऱ्या सामन्यात शार्दुल ठाकूरला गोल्ड मेडलचा किताब देण्यात आला. तिसऱ्या सामन्यात कोणत्या खेळाडूला गोल्ड मेडल देण्यात आले याचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर  अकाउंट वर शेअर केला आहे.

भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टि दिलीप यांनी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी संवाद साधत असताना खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंचा फोटोही दाखवण्यात आला. के एल राहुल, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर यांचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले. गोल्ड मेडल ‘के एल राहुल’ याला देण्यात येणार असल्याचे स्क्रीनवर घोषित केल्यावर सर्वच ड्रेसिंग रूममधील खेळाडूंनी एकच जल्लोष केला. विजेता खेळाडूचे नाव घोषित करतात विराट कोहलीने डोक्याला हात लावून विनोद करताना दिसून आला. भारत आणि पाकिस्तान या सामन्यातला ‘बेस्ट फिल्डर ऑफ द डे’ के एल राहुल ठरला. प्रशिक्षकांनी के एल राहुल याला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गोल्ड मेडल बहाल केले.

विराट कोहली, शार्दुल ठाकूरनंतर गोल्ड मेडल मिळवणारा तिसरा खेळाडू कोण? पहा बीसीसीआयने व्हिडिओ केलाय शेअर

के.एल. राहुल याने विकेटच्या पाठीमागे थांबून सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. सामन्यात पाकिस्तानच्या एका फलंदाजाचा महत्त्वपूर्ण झेल देखील घेतला आहे. तसेच फलंदाजी त्याने नाबाद राहून 19 धावाही काढल्या.

भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण हे अवल दर्जाचे व्हावे, यासाठी टि दिलीप यांनी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला गोल्ड मेडल देण्याची प्रथा यंदाच्या विश्वचषकापासून सुरू केली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणात कमालीची सुधारणा दिसून येत आहे. तसेच खेळाडूंना आपले क्षेत्ररक्षण सुधारण्यासाठी नवी ऊर्जा देत आहे. भारतीय खेळाडू हवेत पक्षासारखे सूर मारत चेंडू अडवताना दिसून येत आहेत.

19 तारखेला पुण्यात रंगणार भारत विरुद्ध बांग्लादेश सामना…

भारताचा पुढचा सामना बांगलादेश विरुद्ध पुण्यात 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ पुण्यात दाखल झाला आहे. भारताने सुरुवातीचे पहिले तीन सामने जिंकले आहेत. भारताने अफगाणिस्तान, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया यासारख्या दिग्गज संघांना पराभूत केल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात विजयी चौकार मारण्यास उत्सुक आहे.


हेही वाचा:

विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी.