धर्मशाळा येथे होणाऱ्या आयपीएलच्या 2 सामन्यांसाठी क्रिकेट प्रेमींना 15 एप्रिल नंतर ऑनलाईन तिकीट मिळणार आहे. हे तिकीट पेटीएम वर उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. धर्मशाळाच्या स्टेडियमवर पहिला सामना 5 मे रोजी पंजाब किंग्स इलेव्हन आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे तर नऊ मे रोजी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दुसरा सामना होणार आहे.
या सामन्यासाठी सर्वात स्वस्त तिकीट 800 रुपयापासून ते हजार रुपये पर्यंतचे असणार आहे. आयपीएल मध्ये तिकिटांचे दर ठरवण्याचा अधिकार हा फ्रेंचाईजीना असतो. पंजाब किंग्स आता तिकिटाचे दर किती ठरवणार हे आता पहावे लागेल. मागील वर्षी आयपीएलचे सर्वात स्वस्त तिकीट 750 रुपयांना मिळत होते यावर 9.44% बुकिंग फीस आकारण्यात आली होती. याही वेळेस आता दर्शकांना तिकिटांवरती बुकिंग फी द्यावी लागणार आहे.
बुक केलेल्या तिकिटाची हार्ड कॉपी मिळवण्यासाठी सामन्याच्या दोन-तीन दिवस आधी स्टेडियमच्या बाहेर तिकीट काउंटर उभे करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनविश परमार यांनी म्हणाले की, आयपीएल सामन्यांचे तिकिट दर फ्रेंचाइजी ठरवत असते. मात्र पाच आणि नऊ मे रोजी होणाऱ्या सामन्याच्या तिकिटाचे दर अद्याप ठरलेले नाहीत. 15 एप्रिल नंतर धर्मशाला येथे होणाऱ्या सामन्याचे तिकीट प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहेत. या सामन्याच्या तयारीसाठी धर्मशाला क्रिकेट असोसिएशनची जोरदार तयारी सुरू झाली आहे.