IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, हा खेळाडू झाला फिट; आयपीएल मध्ये खेळणार

0

IPL 2024:  कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयश अय्यर याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला श्रेयस अय्यर आयपीएल मध्ये खेळणार असल्याची माहिती पुढे आली आहे. एनसीए आणि डॉक्टरच्या टीमने त्याला फिट घोषित केले आहे. मात्र आयपीएल मध्ये खेळताना डॉक्टरांनी त्याला काहीअटी घालून दिल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भ विरुद्ध खेळताना त्याने शानदार 95 धावांची अर्धशतकी खेळी केली. मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला आणि त्याचे शतक हुकले. इंडियन एक्सप्रेस ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यर खेळण्यासाठी फिट असून त्याने मुंबईमधील प्रसिद्ध तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतला आहे.

Shreyas Iyer Declared Fit for IPL 2024, Asked Not to Stretch Too Forward  When Playing Defensive Shot: Report - News18

डॉक्टरांनी त्याला क्षेत्ररक्षण करत असताना पायावर जास्त ताण न देण्याचा सल्ला दिला आहे. लवकरच तो केकेआरच्या संघामध्ये दाखल होणार असून यंदाचे सर्व आयपीएल सामने खेळण्यासाठी तो फिट असणार आहे.

मागील वर्षी श्रेयश अय्यर अन फिट नसल्यामुळे आयपीएल स्पर्धेला मुकला होता. त्याच्या जागी केकेआर संघाच्या नेतृत्वाची धुरा नीतिश राणा याने सांभाळले होते. नितीश राणाच्या नेतृत्वाखाली संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. केकेआर संघाला 14 पैकी केवळ सहा सामने जिंकण्यात यश आले. आयपीएलच्या गुणतालिकेत केकेआरचा संघ सातव्या स्थानावर राहिला.

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, हा खेळाडू झाला फिट; आयपीएल मध्ये खेळणार

नुकत्याच झालेल्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) कसोटी मालिकेदरम्यान श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने उपचारासाठी एनसीए मध्ये दाखल झाला होता. एनसीएने त्याला फिटनेस सर्टिफिकेट दिले. त्यानंतर एका नव्या वादाला ठिणगी पडली. एनसीएने त्याला दुखापतीमुळे खेळण्यास नकार दिला होता, तरी देखील त्याने रणजी क्रिकेटचा अंतिम सामना खेळला होता. बीसीसीआयने देखील त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला. बीसीसीआयने त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीतून बाहेर काढले.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave A Reply

Your email address will not be published.