लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी आनंदाची बातमी: स्टार कर्णधार झाला फिट

Cricket 16

IPL 2024 KL Rahul: आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नॅशनल क्रिकेट अकॅडमी म्हणजेच एनसीएने, केएल राहुल याला इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामात खेळण्यासाठी एनओसी दिली आहे. मात्र अनेक अटी घालून एनसीएने त्याला आयपीएल मध्ये खेळण्यासाठी मुभा दिली आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार राहुल याला आता आयपीएल मध्ये खेळण्यात येणार आहे. मात्र त्याला सुरुवातीच्या काही सामन्यात यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडता येणार नाही. केवळ तो फलंदाज म्हणून आयपीएल मध्ये सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसून येईल.

राहुल इंग्लंड विरुद्धच्या हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटी दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो उर्वरित मालिकेतून बाहेर पडला. तिसऱ्या सामन्यात तो फिट होईल असे वाटले होते. मात्र त्याची दुखावत थोडीशी गंभीर असल्याने त्याने पूर्ण मालिकेतून माघार घेतली.

नुकतेच राहुलने एनसीएमध्ये फलंदाजी यष्टीरक्षण आणि क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसून आला. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओतून तो क्रिकेटमध्ये पुनरागमन. करण्यासाठी सज्ज झाला आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीएने राहुल द्रविडला खेळण्यासाठी मंजुरी दिल्याने तो 20 मार्चपासून लखनऊच्या संघामध्ये दाखल होईल. लखनऊचा पहिला सामना 24 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध जयपूर मध्ये होणार आहे. या सामन्यांमध्ये राहुल यष्टीरक्षकाची भूमिका पार पडणार नसून त्याच्या ऐवजी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डीकॉक अथवा वेस्टइंडीजचा निकोलस पूरण यांच्या वरती जबाबदारी येऊ शकते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *