मुंबई इंडियन्सच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी! हा धडाकेबाज खेळाडू परतणार मैदानात

सूर्यकुमार यादव

मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2024 हा हंगाम काही खास राहिला नाही. या संघाला सलग तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पराभवाची मालिका ही याच हंगामात नसून यापूर्वी देखील त्यांना अशा संकटातून जावे लागले आहे. पाच वेळच्या आयपीएल विजेता टीमची कोणत्याही हंगामात पराभवापासून सुरुवात होते. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या संघाचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्स बरोबर होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आली आहे. 7 एप्रिल रोजी दिल्ली विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव फिट झाला आहे.

सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादव

 

जानेवारी 2024 मध्ये सूर्यकुमार यादव याला हर्नियाच्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. त्यामुळे तो अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांना मुकला. तसेच आयपीएलचे सुरुवातीचे तिन्ही सामने तो खेळू शकला नाही. तो बरेच दिवस बंगळूर येथे नॅशनल क्रिकेट अकॅडमी मध्ये डॉक्टरांच्या देखरेखी खाली उपचार घेत होता. एमसीए मधल्या तज्ञ डॉक्टरांनी सूर्यकुमार यादव याला फिट घोषित केले आहे. नेट्स मध्ये तो काही वेळ फलंदाजी करत होता, त्याला फलंदाजी करून करताना कोणताही त्रास होत नसल्याने फिट घोषित करण्यात आले.

 

सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादव

एनसीएच्या अधिकाऱ्यांनी सूर्यकुमार यादव विषयी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “सूर्या आता फीड झाला आहे. एनसीए मध्ये तो काही वेळ प्रॅक्टिस करत होता. त्याला आता पूर्वीपेक्षा चांगले वाटत आहे. तो आता मुंबई इंडियन्स संघात खेळण्यासाठी तयार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी तो 100% फिट नव्हता. फलंदाजीचा सराव करताना सध्या त्याला कोणताही त्रास होत नसल्याने आम्ही त्याला आयपीएल मध्ये खेळण्यासाठी मुभा दिली आहे.

 

सूर्यकुमार यादवच्या संघात येण्याने मुंबईच्या संघाला फायदा होणार आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये हा संघ अवघ्या 125 धावांवर सर्व बाद झाला होता. मुंबईच्या संघाला सध्या त्याची कमतरता जाणवत आहे. सूर्याच्या परत येण्याने मुंबई संघाचे नशीब पलटू शकते.

 

सूर्यकुमार यादव याला दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेमध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याने मैदानात अद्याप पुर्नआगमन केला नाही. सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन च्या संघात आयपीएल मधील पहिल्या सामन्यात खेळेल अशी चर्चा आहे. मात्र, या वृत्ताला अधिकृतरीत्या दुजोरा मिळाला नाही. पीटीआय ने दिलेल्या माहितीनुसार यादव पहिल्या दोन सामन्याला मुकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज असून त्याच्या नावे 60 टी 20आंतरराष्ट्रीय सामन्यात चार शतके खोकल्याची नोंद आहे. त्याने 171च्या स्ट्राईक रेटने 2,141 धावा केल्या आहेत. येत्या जून महिन्यात अमेरिका व वेस्टइंडीज येथे जून महिन्यात सुरू होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये तो भारताला विश्वचषक जिंकून देण्यामध्ये सूर्यकुमार यादवचा खूप मोठा रोल असणार आहे.

 

 

मुंबई इंडियन्स संघ:

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला,आकाश मधवाल, देवाल्ड ब्रेविस, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी,इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, सूर्यकुमार यादव, क्वेना माफाका.

 

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *