Google Trends 2023: रोहित शर्मा- विराट कोहली नाही तर ‘या’ युवा खेळाडूला 2023 मध्ये सर्वाधिक वेळा सर्च केलं गेलं, 2023 सर्च यादीमध्ये सर्वांत वर…

Google Trends 2023: रोहित शर्मा- विराट कोहली नाही तर 'या' युवा खेळाडूला 2023 मध्ये सर्वाधिक वेळा सर्च केलं गेलं, 2023 सर्च यादीमध्ये सर्वांत वर...

Google Trends 2023: आता 2023 हे वर्ष संपणार आहे. लोक नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरवर्षी प्रमाणेच सर्च इंजिन गुगलने (google Search Engine) या वर्षीचा अहवालही जारी केला आहे ज्यामध्ये चालू वर्षात कोणत्या क्रिकेटपटूला सर्वाधिक सर्च करण्यात आले हे सांगण्यात आले आहे.

गुगलच्या अहवालात, एका भारतीय  युवा स्टारने सर्वाधिक शोधल्या गेलेल्या क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली किंवा रोहित शर्माला देखील मागे सोडले आहे.  टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिल Google Trends 2023 मध्ये म्हणजेच या वर्षी सर्वाधिक शोधल्या गेलेल्या क्रिकेटपटूंमध्ये अव्वल आहे. गिलनंतर न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू रचिन रवींद्र येतो, ज्याने २०२३ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात बॅटने कहर केला होता.

Google Trends 2023:
image Credit- Google

Google (Google Trends 2023) ने विविध श्रेणींची यादी जारी केली ज्यामध्ये विविध गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. खेळांबद्दल बोलायचे तर, या वर्षी अनेक मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात एकदिवसीय विश्वचषक, आशिया चषक, आशियाई खेळ आणि महिला आयपीएल (WPL) यांचा समावेश आहे. इतकं सगळं असूनही या वर्षी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपपेक्षा जास्त लोकांनी आयपीएलला सर्च केलं आहे. या वर्षात भारतातील टॉप 10 सर्च केलेल्या खेळाडूंमध्ये गिल अव्वल स्थानावर राहिला. गिलसाठी हे वर्ष खूप चांगले होते. त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली.

Google Trends 2023: 2023 मधील शुभमन गिलची कामगिरी.

 

शुभमन गिल (Shubman Gill) हा २०२३ साली वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू होता. या वर्षी तो पहिला एकदिवसीय विश्वचषक खेळला. गिलने यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 41 षटकार ठोकले. चालू वर्षात, भारतीय वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत गिल रोहित शर्मानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितने यावर्षी वनडेमध्ये 67 षटकार मारले. एकदिवसीय विश्वचषकानंतर गिल दक्षिण आफ्रिकेत टी-२० मालिकेत पुनरागमन करत आहे. वर्ल्डकपनंतर त्याला ब्रेक देण्यात आला होता.

IND vs SA: तीन वेगवेगळ्या फोर्मेटमध्ये 3 वेगवेगळे कर्णधार, मात्र 'या' 3 खेळाडूंनाच मिळाली सर्व फोर्मेटमध्ये संधी..

दुसरीकडे, डावखुरा फलंदाज रचिन रवींद्र आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये बॅटने चमकला. विश्वचषकात ईश सोधीला दुखापत झाल्यानंतर रवींद्रला न्यूझीलंड संघात स्थान मिळाले. त्याने विश्वचषकातील 10 सामन्यांमध्ये 578 धावा केल्या. रचिन हा भारतीय वंशाचा क्रिकेटर असून त्याला आगामी आयपीएल लिलावात करोडो रुपये मिळू शकतात. रचिनचे वडील बंगळुरूचे आहेत. या नवोदित क्रिकेटपटूचे नाव सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या नावातील पहिले शब्द एकत्र करून ठेवण्यात आले आहे.

Google Trends 2023: रोहित शर्मा- विराट कोहली नाही तर 'या' युवा खेळाडूला 2023 मध्ये सर्वाधिक वेळा सर्च केलं गेलं, 2023 सर्च यादीमध्ये सर्वांत वर...
Image credit- Bcci

यंदा आयपीएलला सर्वाधिक सर्च करण्यात आले. एकदिवसीय विश्वचषक दुसऱ्या स्थानावर होता. क्रिकेट सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, यावर्षी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अधिक लोकांनी शोधला, तर क्रिकेटशी संबंधित प्रश्नावर लोकांनी क्रिकेटमध्ये टाइम आउट म्हणजे काय याचा अधिक शोध घेतला आहे.


हेही वाचा:

IPL 2024 mini auction players list: तब्बल 333 खेळाडूंची यादी समोर, कोण ठरणार सर्वांत महागडा खेळाडू;कोणत्या संघाकडे किती कोटी बाकी? पहा संपूर्ण माहिती..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *