…म्हणून वेस्ट इंडीजचा टी-२० कर्णधार निकोलस पूरनवर लावली तब्बल 16 करोड रुपयांची बोली,लखनौ सुपर जोइटसचा कोच गौतम गंभीरने सांगितले खास कारण..
आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव काल कोच्ची येथे पार पडला. लिलावात प्रामुख्याने विदेशी अष्टपैलू खेळाडूंवर पैश्याची उधळण झाल्याचे पाहायला मिळाली. सेन करण असो की बेन स्टोक्स.. किंवा केमरून ग्रीन हे सर्वच खेळाडू विदेशी असून त्यांना आपल्या संघात घेण्यासाठी सर्वच संघ एकमेकांवर कुरघोडी करतांना दिसले.
इंग्लंडचा युवा अष्टपैलू खेळाडू सेम करण साठी तर जवळपास सर्वच संघ लिलावाच्या मैदानात उतरले होते. शेवटी चेन्नई आणि पंजाब यांच्यात शेवटपर्यंत चाललेल्या बोलीयुद्धात पंजाबने बाजी मारली. आणि करण 18.50 कोटी घेऊन पंजाबच्या संघात सामील झाला.
जवळपास सारखीच परिस्थिती वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पुरन याच्यावर बोली लावतांना सुद्धा होता. पुरनचे नाव पुकारताच हैद्राबाद आणि लखनो मध्ये जबरदस्त क्रेझ दिसली. दोन्हीही संघाला काहीही करून पुरनला आपल्या संघाचा हिस्सा बनवायचे होते हे यावरून दिसते. अंतर शेवटी लखनौ संघाला यात यश आले आणि तब्बल 16 कोटी रुपये मोजून त्यांनी निकोलस पुरनला आपल्या संघात सामील करून घेतले.
Congratulations to @nicholas_47
He will now play for @LucknowIPL #TATAIPLAuction | @TataCompanies pic.twitter.com/ufrPAZawaW
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
निकोलसवर तब्बल 16 कोटी एवढी मोठी बोली लावून संघात घेतले असले तरीही त्यांचा हा निर्णय चुकीचा असून पूरन आयपीएलमध्ये एवढ्या किमतीचा हकदार नसल्याचे काही चाहते सोशल मिडीयावर म्हटले होते. मात्र त्यानंतर आता स्वतः लखनौचा कोच गौतम गंभीर यांनी निकोलसला एवढी मोठी बोली लावून संघात का घेतले? यामागचे कारण सांगितले आहे.
एलएसजीने पूरणवर मोठी रक्कम का खर्च केली ? याचे गौतम गंभीरने दिलेस्पष्टीकरण
लिलावानंतर लखनऊ सुपर जायंट्सचे मार्गदर्शक गौतम गंभीर यांनी पुरनवर एवढा प्रचंड पैसा खर्च करण्याचे कारण सांगितले. जिओ सिनेमाशी बोलताना गंभीर म्हणाला: “गेल्या आयपीएल सीझनमध्ये त्याने काय केले याचा आम्ही विचारही केला नाही. त्याच्याकडील चांगली क्षमता आणि कौशल्य ह्या दोन गोष्टी पाहून आम्ही त्याच्यावर बोली लावायचा निर्णय घेतला होता, असेही गंभीर म्हणाला.
पुढे बोलतांना गंभीर म्हणाला की, खरे तर आमच्या संघाची वस्तुस्थिती जवळपास सर्वांनाच माहिती होती, एक हार्ड हिटर आणि सामना फिनिशर खेळाडू आमच्याकडे कोणीतरी असायला हवा होता. तो 26-27 वर्षांचा आहे आणि कदाचित तो येथून पुढे त्याच्या कामगिरीने यशाच्या शिखरावर जाण्यास सुरुवात करणार आहे.
तो किती धावा करेल यापेक्षा जास्त तो 5/6 क्रमांकावर फलंदाजीस येऊन किती सामने विजयासह फिनिश करेल, हे आमच्यासाठी महत्वाचे आहे,असेही गंभीर म्हणाला. गंभीरच्या या वक्तव्याने जरी त्यांची रणनीती स्पष्ट झाली असली तरीही, पुरनला मात्र 16 करोड रुपयांचे दडपण दूर करील अश्याच काही खेळ्या खेळाव्या लागणार आहे.
आता येणाऱ्या हंगामात मार्चमध्ये तो संघासाठी कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. क्रिकेटच्या ताज्या आणि चालू घडामोडी वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फोलो करायला विसरू नका..