कितीही दिवस बदलले तरीही गौतम गंभीरने भारतीय संघासाठी खेलेलेल्या ह्या 5 खेळ्या कोणताच चाहता विसरू शकत नाही, एकीने तर चक्क भारतला वर्ल्डकप दिला.
गौतम गंभीरच्या कारकिर्दीतील ह्या 5 सर्वश्रेष्ठ खेळ्या कोणताही क्रिकेटचा चाहता विसरू शकत नाही..
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज गौतम गंभीरचे भारतीय क्रिकेटमधील योगदान आपल्या सर्वाना माहिती आहेच. गंभीरने भारताकडून खेळतांना अनेक चांगल्या खेळी खेळल्या आहेत. कधी कधी त्याने एकट्याने स्वतःच्या जीवावर सामने जिंकून दिलेले आहेत. 2011 चा विश्वचषक असो अथवा 2007 चा टी-२० वर्ल्डकप त्याने खेळलेल्या खेळीमुळे तो सर्वांचा आवडता खेळाडू बनला होता.
आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला भारतीय संघाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरबद्दच्या त्या 5खेळ्याबद्दल सांगणार आहोत जेव्हा त्याने संघाला गरज असतांना धुवादार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला होता.
१) 2011च्या विश्वचषक अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 97 धावा : गौतम गंभीरची ही खेळी जवळपास सर्वच भारतीय चाहत्यांनी एकदा तरी पहिली असेलच. २०११ च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात भलेही तो शतक ठोकू शकला नाही मात्र त्याने
खेळलेली ९७ धावांची खेळी ही एखाद्या शतकापेक्षा कमी नव्हती.कारण गंभीरच्या त्याच ९७ धावांच्या खेळीने भारतीय संघाला विश्वचषक जिंकून दिला होता.
View this post on Instagram
सेहवाग बाद झाल्यानंतर एका बाजूने खिंड लढवत गंभीरने ९७ धावांची जबरदस्त खेळी खेळली, त्याच्यासोबत ययुवराज सिंग आणि धोनी यांनीही चांगली फलंदाजी केली . मात्र शेवटी ताबडतोब खेळी खेळल्याने धोनीला अंतिम सामन्याचा ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. हे जरी खरे असले तरी आजही काही क्रिकेट एक्स्पर्ट हे गंभीरलाच सामनावीर समजतात. कारण जर त्याने ९७ धावांची खेळी खेळली नसती तर कदाचित सामना शेवटपर्यंत गेलाच नसता.
२००७ टी-२० विश्वकप फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध 75 धावा: गौतम गंभीरच्या कारकिर्दीतील सर्वांत गाजलेली आंतरराष्ट्रीय खेळी कोणती असेल तर ती हीच खेळी. २००७ च्या टी-२० विश्वकप स्पर्धेत अंतिम समना हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रंगला होता. एका बाजूला पाकिस्तानचे तेज गोलंदाज भारतीय फलंदाजावर भारी पडत होते. तर दुसरीकडे मात्र भारतीय फलंदाज धावा काढण्यात अडखळत होते.
त्याच स्थितीत गौतम गंभीर फलंदाजीस आलाआणि त्याची बॅट पाकिस्तानविरुद्ध चांगली तळपली.एका स्तिथीवर असे वाटत होते की भारतीय संघ १०० धावाही करू शकणार नाही. मात्र गंभीरच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २० षटकात १५७ धावा उभारल्या.या सामन्यात भारतीय संघाने ५ धावांनी पाकिस्तानचा पराभव केला आणि पहिल्यांदा टी-२० वर्ल्डकपवरभारताचे नाव कोरले गेले..
श्रीलंकेविरुद्ध नाबाद 150 धावा:श्रीलंकेविरुद्ध झालेल्या याचं सामन्यात गौतम गंभीरने स्वतःला मिळालेला ‘सामनावीर’ पुरस्कार युवा खेळाडू विराट कोहलीला दिला होता.या एकदिवशीय सामन्यात सचिन आणि सेहवाग लवकर बाद झाल्यावर गंभीरने विराट कोहलीच्या मदतीने तब्बल २२४ धावांची पार्टनरशिप केली होती. गंभीरने त्यात १३७ चेंडूत १४ चौकारमारत नाबाद १५० धावा केल्या होत्या.आणि विराट कोहलीने ११४ धावा काढल्या होत्या, मात्र गंभीरने मनाचा मोठेपणा दाखवत कोहलीला सामनावीर पुरस्कार दिला होता.
ऑस्ट्रोलियाविरुद्ध कसोटीत दुहेरी शतक: दिल्लीच्या मैदानावर गौतम गंभीरने ऑस्ट्रोलियाविरुद्ध कसोटी सामन्यात शानदार दुहेरी शतक ठोकले होते. हा समना टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू अनिल कुंबळे याचा शेवटचा सामना होता. या सामन्यात गंभीरने सचिन आणि लक्ष्मणसोबत शतकीयभागीदारी केल्या होत्या. ज्यात त्याने २०६ धावा ठोकल्या होत्या.भलेही हा सामना अनिर्णीत राहिला मात्र गंभीरच्या या खेळीने त्याचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते.
न्यूझीलंड विरुद्धझ नेपियर कसोटीत १३७ धावा: गौतम गंभीरने आपल्या निवृतीच्याभाषणात सुद्धा या खेळीचा उल्लेख केला होता.न्यूझीलंडमध्ये जेव्हा टीम इंडिया कसोटी हरण्याच्या वळणावर होती, तेव्हा गंभीरने येऊन आपली विकेट न सोडता १३७ धावा काढल्या ज्यामुळे शेवटचा दिवस संपेपर्यंत सुद्धा गंभीर बाद न झाल्यामुळे कसोटी अनिर्णीत सुटली.. या कसोटीत गंभीर जवळपास १० तास मैदानावर तळ ठोकून होता.
हेही वाचा:
अतिशय विचित्र शौक असलेल्या या नवाबाने चक्क आपल्या कुत्रीचे लग्न थाटामाटात लावलं होत..