Cricket News

IND vs NED: विश्वचषकात भारताच्या टॉप 4 खेळाडूंनी रचला इतिहास, प्रथमच भारतीय संघातील खेळाडूंनी केली अशी कामगिरी..!

IND vs NED, Team India Top 4 Record: भारतीय संघाने नेदरलँड्सविरुद्ध आपली अप्रतिम फलंदाजी सुरू ठेवली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि त्याचा सहकारी सलामीवीर रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात केली. या दोघांनी अवघ्या 71 चेंडूत 100 धावा जोडल्या. गिलने 51 आणि रोहितने 61 धावा केल्या. यानंतर विराट कोहली आणि नंतर श्रेयस अय्यरनेही अर्धशतकी खेळी खेळली. अशाप्रकारे टॉप 4 मधील चारही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. एकदिवसीय विश्वचषकाच्या एका डावात असे प्रथमच घडले आहे.

IND vs NED, Team India Top 4 Record:  टॉप ४ ने इतिहास रचला

टीम इंडियाचे टॉप 4 खेळाडू रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. या चौघांनी मिळून एकदिवसीय विश्वचषकात एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी, एकदिवसीय विश्वचषकाच्या एका डावात शीर्ष चार फलंदाजांनी ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या असे घडले नव्हते. विश्वचषकात पहिल्यादाच कोणत्या तरी संघाच्या सुरवातीच्या 4 फलंदाजांनी अर्धशतक लगावले आहेत.

तर टीम इंडियाने वनडे क्रिकेटमध्ये पाचव्यांदा अशी कामगिरी केली आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांचे विश्वचषक २०२३ मधील हे तिसरे अर्धशतक होते. तसेच या विश्वचषकातील चौथे अर्धशतक विराट आणि अय्यरच्या बॅटने झळकावले.

IND vs NED: विश्वचषकात भारताच्या टॉप 4 खेळाडूंनी रचला इतिहास, प्रथमच भारतीय संघातील खेळाडूंनी केली अशी कामगिरी..

भारतासाठी टॉप ४ फलंदाजांनी ठोकले अर्धशतक..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button