आयपीएल मध्ये पदार्पण करणाऱ्या ग्राउंड्समॅनच्या मुलाची सर्वाधिक चर्चा! वाचा कोण आहे तो खेळाडू..

आयपीएल मध्ये पदार्पण करणाऱ्या ग्राउंड्समॅनच्या मुलाची सर्वाधिक चर्चा! वाचा कोण आहे तो खेळाडू..

आयपीएल: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने शनिवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात विजयी चौकार लगावला. आयपीएलच्या 17व्या हंगामामध्ये संजू सॅमसनच्या टीमने आतापर्यंतचा दमदार प्रवास केला आहे. 19 व्या सामन्यात आरसीबीने 20 षटकात 3 बाद 183 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने पाच चेंडू आणि सहा गडी राखून हा सामना आपल्या नावे केला. या सामन्यात आरसीबीकडून युवा खेळाडूने पदार्पण केले होते. त्याने पहिल्या पदार्पणाच्या सामन्यात काही खास कमाल केले नसले, तरी त्याच्या दीडशेच्या स्ट्राईट साऱ्यांना प्रभावित केले.

आरसीबीच्या संघाकडून सौरभ चौहान याने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून पदार्पण केले. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात सहा चेंडूत नऊ धावा केल्या. तो युजवेंद्र चव्हाणच्या 18व्या शतकातील दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जयस्वाल कडून झेलबाद झाला. या छोट्याशा खेळीमध्ये सौरवने एक षटकार मारला. सौरवच्या पदार्पणाविषयी कर्णधार फाफ डुप्लेसी म्हणाला की, “त्याला बरेच लोक ओळखत नाहीत. मात्र त्याच्याकडे जबरदस्त स्किल आहे. त्याच्या फलंदाजी मध्ये दम आहे. तो एक चांगला आणि शांत स्वभावाचा खेळाडू आहे. “

सौरवचा जन्म 27 मे 2000 साली अहमदाबाद येथे झाला होता. 21 वर्षाच्या या खेळाडूने सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी मध्ये पदार्पण केले होते. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचे वडील दिलीप चौहान हेग्राउंड्समॅनचे काम करतात. सौरवने त्याच्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये सहा फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. त्या 225 धावा केल्या आहेत. लिस्ट ए च्या 13 सामन्यांमध्ये त्याच्या नावे दोन शतकाची नोंद आहे. यात 476 धावा केल्या आहेत. याशिवाय टी 20 क्रिकेटमध्ये सौरवच्या नावे 473 धावांची नोंद आहे. नाबाद 84 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

आयपीएल मध्ये पदार्पण करणाऱ्या ग्राउंड्समॅनच्या मुलाची सर्वाधिक चर्चा! वाचा कोण आहे तो खेळाडू..

आपल्या पदार्पणाविषयी बोलताना म्हणाला की, “मी दोन वर्ष सिलेक्शन कॅप मध्ये सहभागी झालो होतो. एक दिल्लीचा होता तर दुसरा आरसीबीचा. मला खूप आनंद होतोय की, मला आरसीबीने आपल्या संघामध्ये घेतले. मी माझ्या यशाचे सारे श्रेय प्रशिक्षक तारक त्रिवेदी आणि आई-वडील तसेच गुजरात क्रिकेट असोसिएशन यांना देतो, ज्यांनी माझी खूपच मदत केली. ”

सौरव तोच फलंदाज आहे, ज्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धमाका केला होता. त्याने आंध्र प्रदेश विरुद्ध खेळताना अवघ्या 13 चेंडूमध्ये धडाकेबाज अर्धशतक ठोकले होते. अभिषेक शर्माने त्याचा हा विक्रम मोडीत काढला. पंजाबच्या या फलंदाजाने 12 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. आरसीबीने आयपीएल लिलावात या 23 वर्षीय खेळाडूला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईज मध्ये खरेदी केले. सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी मध्ये सौरवचा स्ट्राईकरेट सर्वाधिक चर्चेत राहिला. 10 चेंडू खेळल्यानंतर त्याचा स्ट्राईक रेट 338.88 असा राहिला होता. त्याने राजस्थानच्या मंजीत सिंह याला पाठीमागे टकले. त्याचा विक्रम सौरवने मोडीत काढला.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…