- Advertisement -

गुजरात टायटन्स चा यश दयाल ला ५ सिक्स मारल्याने त्याच्या आईने सोडले अन्न, वडिलांनी केला मोठा खुलासा 

0 0

 

 

मागील वर्षी आयपीएलमध्ये यश दयाल ने डेब्यु केला होता जे की त्याने स्वप्नात सुद्धा विचार नसेल केला की १ ओव्हर मध्ये २९ रन्स दिल्या जातील. एवढेच नाही तर आपल्या ५ बॉल मध्ये ५ सिक्स कधी कोण मारेल हे सुद्धा त्याच्या स्वप्नात आले नसेल. जे की या गोष्टीमुळे यश दयाल च नाही तर त्याचे कुटुंब देखील नाराज आहे. यश दयाल ची आई राधा दयाल सुद्धा एवढी नाराज आहे की तिने अन्न देखील खाल्ले नाही. यश चे वडील चंद्रपाल दयाल ने या गोष्टी सांगितल्या आहेत.

 

गुजरात टायटन्स चा खेळाडू यश दयाल ला २८ रन्स चा बचाव करून कोलकाता नाईट रायडर्स ला पराभव करायचे होते. जे की कोलकाता नाईट रायडर्स ला २९ रन्स करायच्या होत्या. जे की यावेळी मैदानावर उमेश यादव आणि रिंकू सिंग होते. जे की उमेश यादव ने पहिल्या बॉल मध्ये १ रन करून रिंकू सिंग ला strike दिली. ज्यावेळी रिंकू सिंग ला strike भेटली तिथून पुढे अशी अदभुत, अविश्वसनीय खेळी चालू झाली कारण रिंकू सिंग ने राहिलेल्या ५ बॉल मध्ये ५ सिक्स मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

ज्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स ने मॅच जिंकली त्यावेळी यश दयाल डोक्याला हात लावून मैदानावर बसला. जे की यश दयाल चे जसे हाल झाले त्याचप्रकारे प्रयागराज मधून त्याचे आई वडील टीव्ही बघत असताना त्यांचे हाल झाले असतील. उत्तरप्रदेश च्या यश ला उत्तरप्रदेश च्या रिंकू ने ५ बॉल मध्ये ५ सिक्स मारले. ज्यावेळी त्याच्या वडिलांची मुलखत घेतली गेली त्यावेळी यश चे वडील म्हणले की ही एक खूप वाईट स्वप्न होते. जे की आपल्या कुटुंबाला तसेच यश ला मजबूत ठेवण्यासाठी त्याच्या वडिलांनी प्रयत्न केले.

नॉर्थ जोन यूनिवर्सिटीसाठी खेळणारे विजी ट्रॉफीसाठी यश चे वडील चंद्रपाल दयाल यांनी सांगितले की खेळामध्ये असे क्षण येतच असतात जे की जरी आपल्या वाट्याला असफलता आली तरी आपण त्यामध्ये खचून जायचे नाही तर धीटपणे उभा राहायचे आणि स्वतःला अजून मजबूत बनवायचे. गुजरात टायटन्स चे कर्णधार रशीद खान यांनी त्यांच्यावर कोणताही आरोप न करता त्यांना सांभाळून घेतले आणि त्यामधून त्यांना बाहेर काढले. जेवण करण्यासाठी गेलेल्या हॉटेल मध्ये हार्दिक पांड्या देखील यशला भेटले.

मॅच झाल्यानंतर यश ची त्याच्या वडिलांसोबत चर्चा झाली त्यावेळी यश ने सांगितले की मैदानावर बॉल अगदी वाईटपणे स्लिप होत होता एवढेच नाही तर रात्री बॉल सुद्धा ग्रीप पकडत न्हवता. जे की याच गोष्टीमुळे यश चा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न असफल होत होता. एवढेच नाही तर एक स्लोवर वन देखील बॉल टाकला त्यावर देखील सिक्स मारला गेला. त्यांनी हे सांगितले ही गोष्ट कोणत्याही खेळाडू सोबत घडू शकते तर एवढेच नाही याआधी देखील असे घडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.