- Advertisement -

गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार आज कोलकाता नाईट रायडर्स मधून जेसन रॉय, तर लिटन दास खेळणार पुढचा सामना

0 0

 

 

आयपीएल २०२३ चा आजचा सामना हा गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघात पार पडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे. कोलकाता नाईट रायडर ने आपल्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी दिली आहे.

 

जेसन रॉय आज कोलकाता नाईट रायडर्स मध्ये आपली एन्ट्री मारणार आहे. बांगलादेशचा हा खेळाडू केकेआरसाठी अजून एक सामना खेळणार आहे. आयपीएलमध्ये आज या दोन्ही संघाची समोरासमोर येण्याची दुसरी वेळ आहे. जे की मागील सामन्यात गुजरात ने मॅच जिंकली होती.

 

जेसन रॉय पदार्पण करणार :-

 

जेसन रॉय ने कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना घालवला. मात्र गुजरात टायटन्सविरुद्ध या हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी जेसन रॉय सज्ज आहे.जेसन रॉय ने कोलकाता नाईट रायडर्स ची जर्सी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. एवढेच नाही तर कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंसोबत त्याने खूप सराव देखील केला आहे. आज कोलकाता नाईट रायडर्स मध्ये तो खेळणार असल्याचे दिसत आहे.

 

लिटन दास पुढच्या सामन्यात पदार्पण करेल :-

 

लिटन दास गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. कारण तो अजून भारतात आलेला नाही. लिटन सध्या आयर्लंडविरुद्धच्या क्रिकेट मालिकेत व्यस्त होता त्यामुळे तो कोलकाता नाईट रायडर्स मध्ये अजून पर्यंत तरी खेळू शकला नाही. मात्र आजचा सामना संपला की पुढच्या सामन्यात तो कोलकाता नाईट रायडर्स या संघात सज्ज होणार आहे. १३ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सामना खेळण्यास तो येणार आहे.

 

२०२३ च्या आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघाची सुरुवात व्यवस्थित झालेली नाही जे की कोलकाता ला किंग्ज पंजाब विरुद्ध पराभुताला सामोरे जावे लागले. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स ने मॅच जिंकत आपली आयपीएल मध्ये वापसी केली आहे. अगदी गुजरात टायटन्स विरोधात देखील कोलकाता ला मॅच जिंकवायची आहे. तर २०२३ मध्ये हार्दिक ची टीम अजूनही एकदा सुद्धा हरलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.