Happy Birthday Rahul Dravid: किस्सा..! जेव्हा सचिन तेंडूलकरने भर पत्रकार परिषदेत राहुल द्रविडला खडसावले होते, आजही राहुलला चांगला आठवतो किस्सा..

Happy Birthday Rahul Dravid: किस्सा..! जेव्हा सचिन तेंडूलकरने भर पत्रकार परिषदेत राहुल द्रविडला खडसावले होते, आजही राहुलला चांगला आठवतो किस्सा..

Happy Birthday Rahul Dravid: आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी खूप खास आहे. सर्वप्रथम भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे. दुसरीकडे, आज माजी भारतीय क्रिकेटपटू आणि संघाचा विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा वाढदिवस आहे.

राहुल द्रविडचा जन्म 11 जानेवारी 1973 रोजी झाला. आज भारतीय प्रशिक्षक ५१ वर्षांचा झाला आहे. अशा स्थितीत भारतीय संघ आपल्या प्रशिक्षकाला त्याच्या वाढदिवसानिमित्त विजयाची भेट देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला द्रविडची एक जुनी गोष्ट सांगणार आहोत, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर त्याच्यावर रागावला होता. चला तर जाणून घेऊया नक्की काय आहे हा किस्सा?

Happy Birthday Rahul Dravid: किस्सा..! जेव्हा सचिन तेंडूलकरने भर पत्रकार परिषदेत राहुल द्रविडला खडसावले होते, आजही राहुलला चांगला आठवतो किस्सा..

भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान घडला होता हा किस्सा.

राहुल द्रविडने भारतीय क्रिकेट संघाला खूप काही दिले आहे. त्याचे योगदान भारतीय संघ कधीच विसरू शकणार नाही, पण आज आपण त्या सामन्याबद्दल बोलणार आहोत जेव्हा क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा खेळाडू सचिन तेंडुलकर द्रविडवर चिडला होता. तसं  पाहायला गेले तर सचिन सहसा मैदानावर किंवा इतर सहकारी खेळाडूंवर रागावताना दिसला नाही, पण 2004 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात सचिन द्रविडवर रागावला होता.

…म्हणून सचिन तेंडूलकर राहुल द्रविडवर भडकला.

29 मार्च 2004 पासून भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात मुलतान कसोटी सामना खेळला जात होता. याच सामन्यात भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने 309 धावांची खेळी केली होती. या सामन्यात सचिन 194 धावांवर फलंदाजी करत असताना या सामन्याचा कर्णधार राहुल द्रविडने डाव घोषित केला. त्यामुळे सचिनला द्विशतक झळकावता आले नाही.

पत्रकार परिषदेत सचिन संतापला.

Happy Birthday Rahul Dravid: किस्सा..! जेव्हा सचिन तेंडूलकरने भर पत्रकार परिषदेत राहुल द्रविडला खडसावले होते, आजही राहुलला चांगला आठवतो किस्सा..

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात सचिन तेंडुलकर आणि राहुल यांच्यात वाद सुरू झाला. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सचिनने राहुलला खूप खडसावले. पत्रकार परिषद देताना सचिन म्हणाला की,

“जर द्रविडने मला आधी सांगितले असते की तो डाव घोषित करणार आहे, तर मी माझे द्विशतक लवकर पूर्ण केले असते. त्याने मला न सांगता डाव घोषित केला आणि माझे द्विशतक झाले नाही.”

याच कारणावरून त्यादरम्यान दोघांमध्ये बराच वाद झाला होता. द्रविडने कोणतीही पूर्वसूचना न देता डाव घोषित केल्यामुळे सचिनला त्याच्यावर राग आला होता. मात्र हा राग नंतर काही दिवसात कमी झाला आणि दोघांनीही पुढे भारतीय संघासाठी अनेक चांगल्या खेळी केल्या..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *