Happy Birthday Rishabh Pant: भारतीय विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत आज २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच पंत त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत आहे. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी (Urvashi Rautela) रौतेलासोबत त्यांचे नाव अनेकदा जोडले गेले आहे.
उर्वशी रौतेला आणि ऋषभ ( Rishabh Pant) पंत यांच्या नात्याबाबत अनेकदा बातम्या आल्या आहेत. मात्र केवळ उर्वशी रौतेलाच नाही तर पंतचे नाव आणखी एका सुंदर महिलेशी जोडले गेले आहे. दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नक्की कोण आहे ही रिषभची गर्लफ्रेंड जाणून घेऊया सविस्तर..
आम्ही ज्या महिलेबद्दल बोलत आहोत ती म्हणजे सोशल मिडिया स्टार आणि इंटेरियर डिझाईनर असलेली ‘इशा नेगी (Isha Negi) आहे.ऋषभ पंत आणि ईशा नेगी रिलेशनशिपमध्ये (Rishabh pant & Ishan Negi in realtionship) असल्याचा दावा अनेकदा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Happy Birthday Rishabh Pant: पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी कोण आहे इशा नेगी?
ईशा नेगी व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे. ईशाने डेहराडूनच्या जीसस अँड मेरी स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. याशिवाय तिने नोएडा येथील एमिटी युनिव्हर्सिटीमधून कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आहे. ईशा अनेक वेळा आयपीएलमध्ये पंतचा सामना पाहण्यासाठी आली आहे. त्यानंतर ईशा नेगीने पंतसोबतचा फोटो शेअर केला आणि तिच्या भावनाही व्यक्त केल्या. त्याने लिहिले होते की ,माझा माणूस, माझा जीवनसाथी, माझा सर्वात चांगला मित्र, माझ्या आयुष्यातील प्रेम ऋषभ पंत. नेगीच्या या पोस्टनंतर त्यांचे नाते चर्चेत आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंत बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये दिसला आहे. त्यानंतर त्यांच्या नात्याच्या बातम्या मीडियामध्ये चर्चेत आल्या होत्या.
View this post on Instagram
डिसेंबर 2022 मध्ये पंतचा कार अपघात झाला होता. जवळपास 14 महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर पंतने आयपीएल 2024 द्वारे पुनरागमन केले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने २०२४ च्या टी२० विश्वचषकातही स्थान मिळवले. यानंतर पंत भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे.
अलीकडेच, त्याने बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने शानदार शतक झळकावले आणि पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात 109 धावा केल्या.
ऋषभ पंतने आतापर्यंत भारतासाठी 35 कसोटी सामने खेळले असून 44.21 च्या सरासरीने 2432 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 33.50 च्या सरासरीने 871 धावा केल्या. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 76 टी-20 सामन्यांमध्ये 1209 धावा केल्या आहेत.
हेही वाचा:
आता त्या गोष्टीची वेळ आली आहे..” कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बाबर आझमने केले मोठे वक्तव्य..