Viral Video: के एल राहुलने सोडला सोपा झेल ज्यामुळे हार्दिक पंड्याच संताप झाला अनावर.. मैदानातचं राहुलला दिल्या शिव्या, व्हीडीओ होतोय तूफान व्हायरल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील 3 वनडे मालिकेतील पहिला सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.त्याचा निर्णय भारतीय अनुभवी गोलंदाज मोहम्मद सिराजने योग्य ठरवत दुसऱ्या षटकातच भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले.
दरम्यान, भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असतांना एक विचित्र घटना घडली. विकेटकीपर म्हणून संघात खेळणाऱ्या केएल राहुलने अशी चूक केली ज्यामुळे कर्णधार हार्दिकही त्याच्यावर नाराज झाला. पांड्याने भर मैदानातच राहुलवर आपला राग व्यक्त केला. राहुलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लाइव्ह मॅचमध्ये कॅप्टन हार्दिकने केएल राहुलला फटकारले,व्हीडीओ व्हायरल..
नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजी करत होता. दुसऱ्या षटकातच संघाला पहिला धक्का बसला. तिसरे षटक आणणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मिचेल मार्शसमोर स्ट्राइकवर होता. शमीचा चेंडू खेळपट्टीवर बचावात्मक रित्या वळला आणि चेंडू विकेटच्या मागे असलेल्या केएल राहुलकडे गेला.
हे पाहताच नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभा असलेला स्टीव्ह स्मिथ धाव घेण्यासाठी धावला. पण मार्श क्रीझच्या बाहेर आला नाही. स्मिथला पाहताच मार्शही धावला पण त्याला उशीर झाला. केएल राहुलच्या हातात मात्र चेंडू लवकर आलाच नाही. त्याने केलेले वाईट यष्टीरक्षण पाहून हार्दिक पंड्या त्याच्यावर चांगलाच भडकला.
मार्श धावबाद होण्यापासून थोडक्यात बचावला. हे पाहून भारतीय संघाचे कर्णधार असलेल्या हार्दिक पंड्याने आपले डोके पकडून राहुलवर राग काढण्यास सुरुवात केली. केएल राहुलने वेळीच चेंडू पकडला आणि गोलंदाजीच्या टोकाला फेकला असता तर भारताला आणखी एक यश मिळाले असते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पहा
ye B- KL kisi kaam ka nhi pic.twitter.com/ogtNqR9rSK
— javed ansari (@javedan00643948) March 17, 2023
नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जे खरे ठरले, दुसऱ्याच षटकात धोकादायक फलंदाज ट्रॅव्हिस हेडला मोहम्मद सिराजने बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि सलामीला आलेला मिचेल मार्श यांनी नुकतेच चांगली भागीदारी सुरू केली. दोघांनी मिळून 54 धावा जोडल्या आहेत. वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाने 10 षटकात 59 धावा केल्या आहेत. मार्श 31 तर स्मिथ 16 धावांवर खेळत आहेत.
हे ही वाचा..
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…