”मला काय फरक पडत नाही,मी तर…” सोशल मिडीयावर ट्रोल करणारांवर भडकला हार्दिक पांड्या, मुंबईच्या कर्णधाराने केलं मोठ वक्तव्य..

''मला काय फरक पडत नाही,मी तर..." सोशल मिडीयावर ट्रोल करणारांवर भडकला हार्दिक पांड्या, मुंबईच्या कर्णधाराने केलं मोठ वक्तव्य..

हार्दिक पांड्या, भारतीय संघाचा खेळाडू ज्याचे नाव जगातील महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये समाविष्ट आहे. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत दुखापतीमुळे  हार्दिक संघाबाहेर होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो भारतीय संघात परतला नाही. पण आता तो आयपीएल २०२४ पूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. हार्दिक क्रिकेटपासून दूर असला तरी त्याच्या एका वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे.त्याला ट्रोल करणाऱ्या लोकांना त्याने सडेतोड उत्तर दिले आहे. नक्की काय म्हणाला हार्दिक पाहूया सविस्तर..

हार्दिकने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले.

''मला काय फरक पडत नाही,मी तर..." सोशल मिडीयावर ट्रोल करणारांवर भडकला हार्दिक पांड्या, मुंबईच्या कर्णधाराने केलं मोठ वक्तव्य..

हार्दिकचे भारतात लाखो चाहते आहेत पण मोठ्या संख्येने लोक त्याला ट्रोल करताना दिसतात. स्टार अष्टपैलू खेळाडूने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यूके 07 रायडर या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान, हार्दिकला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सुपर कारसोबतच्या फोटोबद्दल विचारण्यात आले. याबाबत पांड्याने खुलासा केला की, त्याला टेस्ट ड्राईव्हसाठी कोणीतरी गाडी दिली होती.

 

ट्रोलर्सबद्दल बोलतांना तो पुढे म्हणाला, ‘मी मीडियामध्ये कधीही भाष्य करत नाही, मी कधी केले नाही आणि मला काही फरक पडत नाही.’ पण लोक तुम्हाला कसे ट्रोल करतात हे मला समजत. आणि मुळात कुणी माझ्याबद्दल मुद्दाम ट्रोल करण्याची रणनीती आखून हे करत असेल तर मला थोडासाही फरक पडत नाही, असेही हार्दिक म्हणाला.

 

स्टार अष्टपैलू खेळाडूला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला की, त्याच्या चाहत्यांना त्याच्याबद्दल काय माहित नाही? या प्रश्नावर हार्दिक म्हणाला, ‘माझ्या चाहत्यांना माझ्याबद्दल एक गोष्ट माहित नाही की मी बाहेर जात नाही. मी घरचा माणूस आहे, गेल्या तीन-चार वर्षांत मी क्वचितच बाहेर गेलेलो आहे. मी तेव्हाच बाहेर जातो जेव्हा माझ्या मित्राच्या किंवा कोणाच्या ठिकाणी कार्यक्रम असतो ज्याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. मला घरात राहायला आवडते. एक वेळ अशी होती की मी 50 दिवस घराबाहेर पडलो नाही. मी होम लिफ्ट देखील पाहिलेली नाही, माझ्याकडे माझी होम जिम, होम थिएटर, मला आवडलेल्या गोष्टी माझ्या घरात आहेत.

''मला काय फरक पडत नाही,मी तर..." सोशल मिडीयावर ट्रोल करणारांवर भडकला हार्दिक पांड्या, मुंबईच्या कर्णधाराने केलं मोठ वक्तव्य..

आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्या असणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार..

आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी हार्दिकबाबतचे वातावरण चांगलेच तापले होते. मुंबई इंडियन्सने हार्दिकवर मोठा सट्टा खेळला. मुंबई संघाने हार्दिकचा गुजरात टायटन्ससोबत व्यवहार केला. एवढेच नाही तर रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिकला संघाचा कर्णधार बनवण्यात आले. त्यामुळे मुंबई फ्रँचायझीचे अनेक चाहते त्याच्या विरोधात दिसत होते. मात्र आता हार्दिक आपल्या कामगिरीने विरोधकांचे तोंड गप करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.


==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

BCCI Annual Contract: बीसीसीआई ने या 5 दिग्गज खेळाडूंना कॉन्ट्रॅक्ट मधून वगळले, क्रिकेट करियर वर लागू शकतो कायमचा ब्रेक.

:- यह है असली किंग, जे सचिन, सेहवाग, गंभीर ला जमल न्हवत ते या वाघाने केलं, वाचा सविस्तर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *