VIRAL VIDEO: मागच्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या सँटनरला ‘हार्दिक पांड्या’ने केले जबरदस्त रित्या बोल्ड, काही कळण्याच्या आतच उडवल्या दांड्या, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शनिवारी रायपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने जबरदस्त गोलंदाजी केली. पांड्याने केवळ त्याच्या गोलंदाजीनेच नव्हे तर त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणानेही मैदान गाजवले.. या सामन्यात त्याने इतकी जबरदस्त गोलंदाजी केली की, त्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांचे होश उडवले. पांड्यानेआठव्या क्रमांकाचा फलंदाज मिचेल सँटनरला अशा पद्धतीने गोलंदाजी केली की क्रिकेट चाहते थक्क झाले.
Innings Break!
A brilliant bowling performance from #TeamIndia 👏 👏
3⃣ wickets for @MdShami11
2⃣ wickets each for @hardikpandya7 & @Sundarwashi5
1⃣ wicket each for @mdsirajofficial, @imkuldeep18 & @imShardScorecard ▶️ https://t.co/tdhWDoSwrZ #INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/0NHFrDbIQT
— BCCI (@BCCI) January 21, 2023
हार्दिकच्या गोलंदाजीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.. (Hardik pandya -bowled-mitchell-santner)
हे दृश्य 31व्या षटकात पाहायला मिळाले. भारतीय गोलंदाजांची लय कायम राखत न्यूझीलंडचे होश उडवून पंड्याने या षटकातील पहिल्याच चेंडूवर सँटनरला त्रिफळाचीत केले. पांड्याने हार्ड लेन्थ बॉल टाकला आणि बॉल लागताच सँटनरने मागे सरकून पंच करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू आतल्या बाजूने जाऊन स्टंपला लागला.

अशाप्रकारे पांड्याने टीम इंडियाला मोठी विकेट मिळवून देत किवी संघाचे कंबरडे मोडले. त्याने पहिल्या 6 षटकात फक्त 16 धावा देत 2 बळी घेतले. विशेष म्हणजे यामध्ये तीन मेडिन ओव्हर्सचा समावेश करण्यात आला होता.
सँटनरला बाद करून पंड्याने महत्त्वाची भागीदारी तोडली.
सहावी विकेट पडल्यानंतर सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांनी 47 धावांची भागीदारी पूर्ण केली होती. पंड्याने ही भागीदारी केवळ मोडली नाही तर टीम इंडियाला सातवे यश मिळवून दिले. पांड्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेत किवी संघाचे कंबरडे मोडले. न्यूझीलंडचा संघ 34.3 षटकांत 108 धावांत गारद झाला. किवी संघाकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 52 चेंडूत 36 धावा केल्या.
पहा व्हायरल व्हिडीओ..
Hardik Pandya strikes 💥
Dismissed Michele Santner. #INDvNZ #NZvsIND #siraj #Shami #HardikPandya𓃵 #HardikPandya pic.twitter.com/4mKrj2O6Sl— Sachin Viratian🇮🇳 (@asmylemalhotra1) January 21, 2023
हे ही वाचा…
चेंडू हातात असताना देखील यष्टिरक्षकाने गमावली सहज धावबादची संधी, व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार