IPL 2024 सुरु असतांना हार्दिक पंड्याच्या भावाला अटक, या प्रकरणामध्ये केली मुंबई पोलिसांनी कारवाई… पहा नक्की काय आहे प्रकरण…

0
2
IPL 2024 सुरु असतांना हार्दिक पंड्याच्या भावाला अटक, या प्रकरणामध्ये केली मुंबई पोलिसांनी कारवाई... पहा नक्की काय आहे प्रकरण...

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

IPL 2024: यावेळी IPL 2024 मध्ये हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. सलग तीन सामने गमावल्यानंतर मुंबईने एक विजय मिळवला मात्र तरीही संघाचा त्रास कमी झालेला नाही. आता हार्दिक पांड्याच्या भावाला स्पर्धेदरम्यान अटक करण्यात आली आहे. क्रिकेटरची फसवणूक केल्याप्रकरणी हार्दिकच्या सावत्र भावाला अटक करण्यात आली आहे. मात्र, खुद्द हार्दिकने याबाबत तक्रार केली होती.

IPL 2024 सुरु असतांना हार्दिक पंड्याच्या भावाला अटक, या प्रकरणामध्ये केली मुंबई पोलिसांनी कारवाई... पहा नक्की काय आहे प्रकरण...

मुंबई पोलिसांनी केली अटक, नक्की काय आहे प्रकरण ?

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्याला मुंबई पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. वास्तविक, वैभव पांड्याला त्याच्याच सावत्र भावांची 4.3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आढळले आहे. वैभवसोबतच हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या यांचाही एका व्यवसायात हिस्सा होता. ज्यामध्ये हार्दिक आणि कृणाल यांचा प्रत्येकी ४० टक्के तर वैभवचा २० टक्के वाटा होता.

या व्यवसायातील प्रत्येक व्यक्तीच्या हिस्सेदारीनुसार नफा विभागला जायचा. मात्र वैभवने हे केले नाही. कंपनीचा नफा आपल्या भावांना देण्याऐवजी वैभवने वेगळी कंपनी स्थापन करून ती त्याच्याकडे हस्तांतरित करून व्यवसायाच्या भागीदारी कराराचा भंग केला. त्यानंतर हार्दिक आणि कृणालने ४.३ कोटी रुपयांचे नुकसान नोंदवले. एवढेच नाही तर कुणालाही न सांगता वैभवने या भागीदारीतील नफ्यातील हिस्सा २० टक्क्यांवरून ३३.३ टक्के केला होता.

हार्दिकने स्वतः तक्रार दाखल केली होती.

वास्तविक, हार्दिक पांड्याने स्वतः वैभव पांड्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने वैभव पांड्याला अटक केली. यानंतर न्यायालयाने वैभवला पोलीस कोठडी सुनावली.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here