हार्दिक पांड्या अनफिट! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो नाही खेळणार? समोर आली मोठी माहिती.

 

भारताचा विश्वचषक स्पर्धेतील पाचवा सामना न्यूझीलंडविरुद्ध 22 ऑक्टोंबर रोजी रविवारी होणार आहे. धर्मशालाच्या मैदानावर होणाऱ्या या महत्वपूर्ण सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण पांड्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात खेळताना जखमी झाला आहे.

 IND vs BAN: चालू सामन्यात हार्दिक पांड्या झाला जखमी

बांगलादेशची फलंदाजी सुरू असताना 9वे षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्याला पाचारण करण्यात आले. सलामीवीर लिटन दास याने त्याच्या तीन चेंडूत सलग दोन चौकार ठोकले. त्याने मारलेला स्ट्रेट ड्राइव्ह पायाने अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू अतिवेगात असल्याने तो थेट त्याच्या पायाच्या घोट्याला लागला. चेंडूचा मार घोटाला जबरदस्त लागल्याने पंड्या मैदानावरच वेदनेने कळवळू लागला. त्यानंतर भारताची फिजिओ टीम मैदानात दाखल झाली. त्याच्या पायाला पट्टी बांधून मैदाना बाहेर नेण्यात आले. 

हार्दिक पांड्या

पांड्याला झालेली जखम ही किती मोठी आहे हे पाहण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये स्कॅन करण्यासाठी घेऊन गेले. त्यानंतर पांड्या मैदानात परत गोलंदाजी करण्यासाठी आला नाही. त्याचे षटक पूर्ण करण्यासाठी रोहित शर्माने विराट कोहलीला बोलवले. विराटने तीन चेंडू टाकून नववे षटक पूर्ण केले. पांड्या अजूनही लंगडत चालत असताना दिसून येत आहे. त्याचा पाय पूर्णपणे सुजलेला आहे. इंग्लंडचे एक प्रसिद्ध डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत.

दुखाग्रस्त पांड्या हा जर पुढच्या सामन्यात फिट नसेल तर त्याला आराम दिला जाऊ शकतो. भारताची पुढची महत्त्वपूर्ण मॅच न्यूझीलंड सारख्या तगड्या संघाबरोबर होणार असल्यामुळे पांड्याच्या जागी कोणाला खेळवावे हा संघ व्यवस्थापनापुढे मोठा प्रश्न आहे. विश्वचषकातील 3 सामन्यात 5 महत्त्वपूर्ण गडी बाद केले आहेत. बीसीसीच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पांड्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. मात्र तो इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात उपलब्ध असेल, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

विराट कोहली

पांड्या फिट नसेल तर त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला खेळवले जाऊ शकते. सूर्याने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना खेळला नाही. पुढच्या सामन्यात शार्दूल ठाकूर बाहेर बसू शकतो. कारण त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात त्याने 9 षटकाची गोलंदाजी करत 59 धावा देत एकही गडी बाद करता आला नाही. पांड्याला पर्यायी म्हणून आर अश्विन हा देखील सामन्यात खेळू शकतो. अश्विन हा गोलंदाजी सोबत फलंदाजी देखील करू शकतो.

शार्दुल ठाकूरच्या जागी एक स्पेशलिस्ट वेगवान गोलंदाज खेळू शकतो. कारण धर्मशाळाची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना मदतगार आहे. पुढच्या सामन्यात ठाकूरला न खेळवल्यास त्याच्या जागी शमीला संधी मिळू शकते. दिवस-रात्र होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघ पाच स्पेशलिस्ट गोलंदाज घेऊन खेळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *