Viral Video: मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर पहिल्यांदाच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये पोहचला हार्दिक पांड्या, स्वागताचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल ..

हार्दिक पांड्या: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   हा व्हिडिओ जामनगरचा आहे, जिथे हार्दिक रिलायन्स इंडस्ट्रीजला भेट देण्यासाठी गेला होता. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आणि आता याबाबत अनेक दावे केले जात आहेत.

पंड्याला अलीकडेच मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 साठी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तो रोहित शर्माची जागा घेईल, ज्याने फ्रँचायझीला विक्रमी 5 वेळा चॅम्पियन बनवले आहे. पांड्याला कर्णधार बनवल्यानंतर अनेक चाहत्यांना हा निर्णय आवडला नाही आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. चाहत्यांनी मोठ्या संख्येने MI ला अनफॉलो केले.

Viral Video: मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर पहिल्यांदाच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये पोहचला हार्दिक पांड्या, स्वागताचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल ..

दिग्गज अष्टपैलू खेळाडूचा गुजरातच्या जामनगर येथील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रिलायन्सच्या उद्योगाला भेट देण्यासाठी पोहोचला आहे आणि त्यादरम्यान त्याचे घोडे आणि ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. अशातच या भव्य स्वागताचे फोटोही व्हायरल होत असून चाहते त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

आयपीएल 2024 (IPL 2024) साठी हार्दिक पांड्या असणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार.

मुंबईने गुजरात टायटन्सकडून ट्रेडद्वारे 31 वर्षीय खेळाडूचा संघात समावेश केला आहे. त्याने यापूर्वी दोन हंगामात गुजरातचे कर्णधारपद भूषवले आहे आणि दोन्ही वेळा संघाला अंतिम फेरीत नेले आहे. यावेळी त्याने 2022 मध्ये GT ला चॅम्पियन बनवले होते. आता आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स कशी कामगिरी करते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

उल्लेखनीय आहे की, गेल्या काही दिवसांपासून हार्दिकबाबत विविध प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. आता पीटीआय या वृत्तसंस्थेकडून एक अहवाल आला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की पंड्या जानेवारीत अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. याशिवाय, तो आयपीएल 2024 पर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त परत येऊ शकतो.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *