ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागेवर हार्दिक पंड्या याला संघाचे नेतृत्व पद बहाल केले. त्यामुळे हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. आयपीएलच्या तयारीसाठी मुंबई इंडियनचे सर्व खेळाडू सोमवारी मैदानात उतरले तेव्हा हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा हे दोघेही आमने-सामने आले. रोहित शर्मा मैदानावर येताच हार्दिक पांड्याने त्याची गळा भेट घेऊन स्वागत केले. दोघांच्या गळा भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला.
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधार पदाची जबाबदारी काढून घेत, त्याला केवळ फलंदाज म्हणून संघात घेतले आहे. सध्या मुंबई इंडियन्सचे सराव शिबिर सुरू आहे. या सराव शिबिरामध्ये सर्व खेळाडू एकत्रित आले असता, हार्दिक पंड्याने रोहित शर्माची गळाभेट घेतली आणि अलगद हा क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपला गेला. त्यांच्या या दोघांचा गळा भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अल्पावधीतच प्रचंड व्हायरल झाला. रोहितच्या हावभाव वरून दोघांमध्ये काहीतरी वाद असल्याचे दिसून येते.
रोहित शर्मा नेट सेशनमध्ये बराच वेळ फलंदाजीचा सराव करत होता. त्याच्याकडून मुंबई इंडियन्सला खूप सार्या अपेक्षा आहेत. त्याला कर्णधार पदावरून दूर केल्यापासून मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये वातावरण तापले असल्याचे दिसून येते. मात्र, हे वातावरण अधिकच बिघडल्याचे नुकत्याच एका घटनेवरून दिसून येते. अलिबाग येथे मुंबई संघाचे बॉण्डिंग सेशन होते. यामध्ये रोहित शर्मा दिसून आला नाही. तो मैदानावर फलंदाजीचा सराव करत थांबला होता.
पहा व्हिडीओ,
View this post on Instagram
मुंबई इंडियन्स ने रोहित शर्माला कर्णधार पदावरून दूर केले मात्र, अद्याप याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मुंबई इंडियन्स आयपीएल 2024 मधील पहिला सामना 24 मार्च रोजी गुजरात टायटन संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली कसा खेळतो, याचीच सर्व उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागून राहिली आहे.
==
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
- IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…
- IPL RECORDS: आयपीएल मधील हे अविश्वसनीय विक्रम मोडणे जवळपास अशक्यच,कोणत्याही स्टार खेळाडूला सुद्धा जमणार नाही अशी कामगिरी..!