Ban ON Hardik Pandya: आयत्या वेळी मुंबईत जाण्याची पांड्याला मोजावी लागू शकते किंमत, आयपीएल समिती घालणार एवढ्या वर्षांसाठी बंदी..

Hardik Pandya IPL Ban Spicules: आयपीएल 2024 च्या मिनी लिलावाआधी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचे कर्णधारपद सोडून मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. यानंतर सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती. पैशाच्या मागे धावत असल्याबद्दल कोणीतरी हार्दिकची कोंडी करत त्याला मोठ्या प्रमाणत ट्रोल करण्यात आले.

 तर दुसरीकडे त्याच्या जुन्या संघात परतल्याबद्दल कुणीतरी आनंद व्यक्त केला. आता आयपीएलमधील एक असा नियम समोर आला आहे ज्यामुळे हार्दिक पांड्या वाईटरित्या अडकू शकतो. केवळ फसत नाही तर त्याच्यावर एक वर्षाची आयपीएलमधून बंदीही येऊ शकते. असे प्रश्न आतापर्यंत चाहत्यांनी उपस्थित केले होते.   आता तर फ्रँचायझी केकेआरच्या माजी संचालकानेही यावर आवाज उठवला आहे. नक्की काय आहे प्रकरण आणि हार्दिक पंड्या कसा यात अडकू शकतो जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

IPL Rules  During Trade:रवींद्र जडेजावर 13 वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली होती

कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) माजी संचालक जॉय भट्टाचार्य यांनी एका यूट्यूब चॅनलवर याबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी हार्दिक पांड्याचा हा ट्रेड नियमानुसार चुकीची मानली आणि याआधी आयपीएलमध्येही हा वाद निर्माण झाला होता. ज्यानंतर रवींद्र जडेजावर १३ वर्षांपूर्वी संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे आता हार्दिकवर देखील तश्याच पद्धतीने कारवाई होणार का हे पाहावे लागेल, असे भट्टाचार्य म्हणाले.

नक्की काय झाले होते आयपीएल 2010 मध्ये का घातली गेली होती रवींद्र जडेजावर एका वर्षासाठी बंदी?

2010 मध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचा (RR) भाग होता. व्यापार प्रक्रियेदरम्यान त्यांनी मुंबई इंडियन्सशी बोलणी सुरू केली होती. एकीकडे राजस्थानने करार वाढवून त्याला कायम ठेवले होते. तर दुसरीकडे जडेजाने मुंबईमध्ये  जाण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यांच्या सोबत बोलणी सुरु केली होती . यानंतर आयपीएलच्या तत्कालीन व्यवस्थापन समितीने जडेजावर कारवाई करत त्याच्यावर एक वर्षाची बंदी घातली होती.

 IPL 2024: हार्दिक पंड्या (Hardik Pandya) का अडकू शकतो?

जी गोष्ट 2010 मध्ये रवींद्र जडेजासोबत घडली होती तीच गोष्ट आता हार्दिक पांड्याच्या बाबतीत घडली आहे. हार्दिक पांड्याचं नाव गुजरात टायटन्सच्या कायम ठेवण्याच्या यादीत होतं पण काही तासांतच तो मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला.

Ban ON Hardik Pandya: आयत्या वेळी मुंबईत जाण्याची पांड्याला मोजावी लागू शकते किंमत, आयपीएल समिती घालणार एवढ्या वर्षांसाठी बंदी..

यावर जॉय म्हणाला,

“मला वाटत नाही की ही या स्पर्धेसाठी चांगली कल्पना आहे. कारण 2010 मध्येही असेच काही घडले होते आणि रवींद्र जडेजावर बंदी घालण्यात आली होती. हाच ट्रेंड चालू ठेवला तर भविष्यासाठी ते चांगले नाही. 2010 मध्ये तुम्ही ते थांबवले आणि आता तुम्ही प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे कोणत्याही मोठ्या खेळाडूने हा ट्रेंड सुरू करणे मला योग्य वाटत नाही.”

त्यामुळे आता बीसीसीआय आणि आयपीएल व्यवस्थापन समिती खरच हार्दिक पंड्यावर करवाइ करनार की? पांड्यासाठी वेगळा नियम आणि जडेजासाठी वेगळा नियम असा भेदभाव करणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *