भारतीय संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. मात्र त्याने असे काही कृत्य केले आहे ज्यावरून असे दिसून येते की, तो भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी परफेक्ट नाहीये. न्यूझीलंड संघाविरद्ध झालेल्या पहिल्या टी -२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. याच सामन्यात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण सुरू असताना, हार्दिक पंड्याचे रौद्ररूप पाहायला मिळाले.
न्यूझीलंड विरुध्द झालेल्या पहिल्या टी -२० सामन्यात हार्दिक पंड्या फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला धमकी देताना दिसून आला. भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना, १५ वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला होता. या षटकातील शेवटचा चेंडू फलंदाज डॅरेल मिशेलच्या पॅडला लागून हवेत गेला आणि यष्टिरक्षण करत असलेल्या ईशान किशनने तो झेल टिपला. पंचांकडे मागणी केली असता, पंचांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे हार्दिक पंड्याने खेळाडूंकडे डीआरएस घेण्याबाबत विचारणा केली.
कुलदीप यादवला चांगलेच माहीत होते की, चेंडू फलंदाजाच्या हाताला स्पर्श होऊन गेला आहे. मात्र ईशान किशनला याबाबत खात्री नव्हती. त्यानंतर हार्दिक पंड्याने कुलदीप यादव सोबत चर्चा करून डीआरएस घेतला. यादरम्यान हार्दिक पंड्या कुलदीप यादवला म्हणाला की, “विचार करून बोल, यापुढे संधी देणार नाही.”
अर्शदीपला शेवटचे षटक देण्याचा निर्णय..
पहिल्या टी -२० सामन्यात हार्दिक पंड्याने एक मोठी चूक केली. फ्लॉप ठरत असलेल्या अर्शदीप सिंगला शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी दिली. या षटकात त्याने २७ धावा खर्च केल्या. जर त्याने शेवटचे षटक अर्शदीप सिंगला दिले नसते तर २७ धावा खर्च झाल्या नसत्या.
हे ही वाचा..
दुसऱ्या टी -२० साठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ईलेव्हेन,’या’ २ खेळाडूंना मिळणार डच्चू