“बूमराह संघात आहेत का नाही? याने काही जास्त फरक पडत नाही” विश्वकपआधी हार्दिक पंड्याने केले वादग्रस्त वक्तव्य, सोशल मीडियावर होतेय हार्दिकवर टीका..
भारताचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या टीम इंडियामधुन बाहेर आहे. त्याच्या पतीच्या दुखण्यातून तो आजूनही सावरला नाहीये. विशेष म्हणजे, पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह गेल्या वर्षी सप्टेंबरपासून संघाचा भाग बनू शकला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीतला पूर्णपणे बरा होण्यासाठी आणखी 6 महिने लागू शकतात. दरम्यान, टीम इंडियाचा तात्पुरता कर्णधार हार्दिक पांड्याने जसप्रीत बुमराहबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये एक मोठ वक्तव्य केल आहे . ज्यामुळे सध्या त्याच्यावर टीका केली जात आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबद्दल बोलताना कर्णधार हार्दिक पंड्या नक्की काय म्हणाला?
View this post on Instagram
पत्रकार परिषदेत बोलतांना हार्दिक पंड्या म्हणाला की, “जस्सीच्या असण्याने किंवा नसण्याने भारतीय संघाला काही फरक पडत नाही” खरे सांगायचे तर जस्सी संघात नसल्यामुळे भारतीय संघाला कोणतीही अडचण नाही.
हार्दिकने हे वक्तव्य अशा वेळी केले आहे जेव्हा विश्वचषक-2023 अगदी जवळ आला आहे.
स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने पुढे बोलतांना संगितले की, जस्सी काही दिवसांपासून टीम इंडियासोबत नाही. मात्र संघाचा गोलंदाजी विभाग सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आमचे सर्व गोलंदाज आता अनुभवी आहेत. जस्सीवर नुकतीच न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया झाली. तर जस्सीचे लक्ष्य वर्ल्ड कपपर्यंत पुनरागमन करण्याचे आहे.
पुढे बोलताना हार्दिक म्हणाला की ,जस्सीच्या उपस्थितीमुळे संघात फरक पडतो. पण आम्हाला याची फारशी चिंता नाही. जस्सीच्या जागी संघात घेतलेल्या गोलंदाजांवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

अलीकडेच, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने सांगितले होते की, विश्वचषकापूर्वी जस्सी (जसप्रीत बुमराह) पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. दुसरीकडे, जस्सीवर काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती जी यशस्वी झाली होती.
अहवालानुसार तो भारतात होणाऱ्या विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त राहू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह मार्चपर्यंत न्यूझीलंडमध्ये राहू शकतो. वर्ल्डकपपूर्वी बुमराहचे पुनरागमन झाले तर टीम इंडियासाठी आनंदाची बातमी असेल.
हेही वाचा:
2023 चा वर्ल्डकप जिंकून मी निवृत्ती घेणार- इंग्लंडच्या या स्टार खेळाडूने केला मोठा खुलासा..
ऐन वर्ल्डकप मध्ये रिषभ पंत बनला संगीतकार, क्रिकेट सोडून आता करतोय ही कामे..
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..