भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला १६८ धावांनी पराभूत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यासह टी -२० मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सध्या टी -२० क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करतोय. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की,हार्दिक पंड्याला लवकरच भारतीय टी -२० संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते. ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी हार्दिक पंड्या देखील तयार असल्याचे म्हटले आहे. त्याने संघाची जबाबदारी स्वीकरण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचे म्हणणे आहे की, तो आता कुठलाही दबाव सहजरित्या हाताळू शकतो. २९ वर्षीय हार्दिक पंड्या आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. यापूर्वी एमएस धोनी फिनिशरची भूमिका पार पाडायचा. आता हार्दिक पंड्या ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी सज्ज झाला आहे.
सामना झाल्यानंतर त्याने म्हटले की, “खरं सांगायचं झालं तर, मी नेहमीच षटकार मारण्याचा आनंद घेतला आहे. मात्र मला आणखी पुढे जायचं आहे. मी या खेळाडूंपैकी अधिक सामने खेळले आहेत. मला अनुभव आला आहे की, आता दबाव कशाप्रकारे हाताळायचा.” एमएस धोनी आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जायचा. आता हार्दिकलाही वाटते की, तो धोनीची जागा घेऊ शकतो.

हार्दिकने पुढे म्हटले की, “आता मला माझा स्ट्राईक रेट कमी करावा लागेल. मला ती भूमिका पार पाडण्यात काहीच हरकत नाहीये, जी भूमिका एकेकाळी एमएस धोनी पार पाडायचा.” हार्दिकने आतापर्यंत खेळलेल्या ८७ टी -२० सामन्यांमध्ये १२७१ धावा केल्या आहेत.
हे ही वाचा..
शुभमन गिल नव्हे तर सूर्यकुमार यादवने ‘या’ खेळाडूला म्हटले ‘गेम चेंजर’
मन जिंकलस भावा! तिसऱ्या टी -२० सामन्यात हार्दिक पंड्याने केलेल्या त्या कृत्याची सर्वत्र चर्चा..