“विचार केला नव्हता की, आम्ही सामना गमवू” पहिल्या टी-20 मध्ये झालेल्या पराभवामुळे कर्णधार हार्दिक पंड्या दुखी, या खेळाडूंवर फोडले पराभवाचे खापर.

“विचार केला नव्हता की, आम्ही सामना गमवू” पहिल्या टी-20 मध्ये झालेल्या पराभवामुळे कर्णधार हार्दिक पंड्या दुखी, या खेळाडूंवर फोडले पराभवाचे खापर.
शुक्रवारी रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. किवी संघाने 20 षटकात 176 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या तीन विकेट अवघ्या 15 धावांत पडल्या. यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने डाव सांभाळला, पण तेही फार काळ टिकू शकले नाहीत.
सूर्याने 47 आणि पांड्याने 21 धावा केल्या. लोअर ऑर्डरवर वॉशिंग्टन सुंदरने शानदार फलंदाजी केली, त्याने 28 चेंडूत 50 धावा केल्या, पण टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने पराभवाचे कारण सांगण्याचा प्रयत्न केला.

पंड्या म्हणाला- ‘विकेटअशी होईल असा विचारही कोणी केला नव्हता. हे पाहून दोन्ही संघ आश्चर्यचकित झाले, परंतु त्यांनी त्यावर चांगले क्रिकेट खेळले आणि त्यामुळे त्यांच्याबाजूने निकाल लागला. किंबहुना, नवीन चेंडू जुन्यापेक्षा जास्त टर्न घेत होता आणि ज्या पद्धतीने तो फिरत होता आणि उसळी घेत होता, त्याने आम्हाला आश्चर्यचकित केले.
आम्ही तशी फलंदाजी करत होतो मात्र मागे वळून पाहता, मला वाटत नाही की ही 177 धावांची विकेट नव्हती. आम्ही चेंडूने 20-25 अतिरिक्त धावा दिल्या. तरीही हा युवा खेळाडूंचा संघ आहे, आम्ही यातून नक्कीच धडा घेऊ आणि पुढील सामन्यात कमबॅक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, असं कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला..
That's that from Ranchi.
New Zealand win the first T20I by 21 runs in Ranchi.#TeamIndia will look to bounce back in the second #INDvNZ T20I.@mastercardindia pic.twitter.com/Lg8zmzwYVH
— BCCI (@BCCI) January 27, 2023
वॉशिंग्टन सुंदरचं केले कौतुक..
पांड्याने वॉशिंग्टन सुंदरचे कौतुक करतांना म्हटले की, त्याने ज्या प्रकारे गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केले, त्यावरून सामन्याचा दिवस त्याचा असल्याचे दिसून येत होते. तो सर्वच बाबतीत अतिशय परिपूर्ण वाटत होता.
आम्हाला अशा व्यक्तीची गरज होती जी फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकेल, आम्हाला खूप आत्मविश्वास देईल आणि तो आम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. मात्र, या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया लखनौमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करेल. दुसरा टी-20 सामना 29 जानेवारीला होणार आहे.
हे ही वाचा..
पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटपटू स्वतःला म्हणतोय विराट कोहली पेक्षा श्रेष्ठ..
हृदयद्रावक घटना!गोलंदाजी करत असताना ३२ वर्षीय तरुणाने गमावला जीव