‘फिफ्टी आणि सेंच्युरी म्हणजे टाइमपास करणे’, हार्दिक पांड्याने दिली या दिग्गज खेळाडूंना खुन्नस.

Cricket 7

 

 

क्रिकेट हा आपल्या देशातील लोकांचा आवडता खेळ आहे. क्रिकेट मध्ये फलंदाजी गोलंदाजी खूप महत्वाची आहे फलंदाजी आणि गोलंदाजी ही एकमेकांवर अवलंबून असते फलंदाजी आणि गोलंदाजी साठी तेवढंच समान महत्व आहे.

Cricket 7

 

भारतीय क्रिकेट संघाचे ऑल राऊंडर खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या ला ओळखले जाते. भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज तसेच चपळ गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्या सतत चर्चेत असतो. शिवाय यंदा हार्दिक पांड्या रणजी ट्रॉफी सामन्यात खेळाला नसून ही BCCI ने हार्दिक पांड्या ला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मध्ये सामील करून घेतले आहे. तसेच हार्दिक पांड्या ने सोशल मीडिया वर एक पोस्ट टाकली आहे आणि त्यावर लिहले आहे “रिश्ते में तो हम तुम्हारे कैप्टन लगते हैं, नाम है पांड्या” हे विधान सोशल मीडिया वर प्रचंड मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.

 

 

पांड्याने हातवारे करत केला मोठा खुलासा:-

हार्दिक पांड्याला त्याच्या माईलस्टोनबद्दल विचारण्यात आले होते तेव्हा त्याने इशारे करत एका मोठ्या विधानाचा खुलासा केला आहे. त्यामुळे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रोल सुद्धा होत आहे.

 

तसेच हार्दिक पांड्या ने रोहित शर्मा आणि विराट कोहली ला संबोधून म्हंटले की, अर्धशतक किंवा शतक मारणे माझ्यासाठी वेळ वाया घालवण्यासारखे आहे. त्यामुळे माझा माईलस्टोनबद्दल हा आपला संघ कसा जिंकेल एवढंच आहे. शतक किंवा अर्ध शतक मारणे फार मोठी गोष्ट नाही. संघ जिंकणे त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे.

 

हार्दिक पांड्या घेतोय बदला:-

हार्दिक पांड्या रोहित शर्मा आणि विराट कोहली शी पंगा घेताना सर्वांना दिसतोय. रिश्ते में तो हम तुम्हारे कैप्टन लगते हैं, नाम है पांड्या” असे उद्गार रोहित शर्मा साठी वापरले असताना अनेक फॅन्स नी हार्दिक पांड्या ला ट्रोल केले आहे. शिवाय शतक आणि अर्धशतक मारणे म्हणजे वेळ वाया घालवणे असे म्हणत रोहित शर्मा आणि विराट कोहली कडे हातवारे केले.

 

विराट कोहलीच्या नावी सगळ्यात मोठा रेकॉर्ड :-

ICC विश्वचषक २०२३ मध्ये विराट कोहलीने त्याचे ५० वे एकदिवसीय शतक झळकावले. या शतकासह त्याने क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. सचिनने आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत एकूण 49 शतके झळकावली आहेत, मात्र विराट कोहलीने 50 शतके झळकावून सचिन तेंडुलकरचा हा महान विक्रम मोडला आहे.

 

 

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हे ही वाचा:- WPL VS IPL : नक्की काय आहे विराट कोहली आणि स्मृति मंधाना मध्ये कनेक्शन, जाणून घ्या सविस्तर.

 

 

हे ही वाचा:- IPL 2024: हे तीन दिग्गज खेळाडू आहेत धोनीच्या कर्णधारपदाचे चाहते, जाणून घ्या सविस्तर.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *