IND vs PAK: क्रिकेट विश्वचषक 2023मध्ये अहमदाबादच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध सुरू असलेल्या साखळी सामन्यात टीम इंडियाने धारदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम पाकिस्तानी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. पाकिस्तानच्या सलामीच्या फलंदाजांनी देखील आक्रमक सुरुवात केली. मोहम्मद सिराजने अब्दुल शफीकच्या रूपाने भारतीय संघाला पहिली विकेट मिळवून दिली. यानंतर हार्दिक पांड्याने अशी जादू केली की लवकरच दुसरी विकेटही पडली.
रोहित शर्मा ने 13व्या षटकात हार्दिकच्या हातात चेंडू दिला होता. तो इमाम उल हकला गोलंदाजी करण्यापूर्वीतो चेंडू त्याच्या ओठांजवळ घेऊन काहीतरी बोलतांना दिसला. हार्दिकने चेंडू टाकताच चेंडू इमामच्या बॅटची कड घेऊन केएल राहुलच्या हातात पडला. इमामने 38 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 36 धावांची खेळी केली. इमाम पॅव्हेलियनमध्ये परतत असताना हार्दिकने त्याला चिडवले आणि बाय-बाय चा हावभावही केले.
हार्दिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच क्रिकेट चाहत्यांनी त्यावर जोरदार कमेंट केल्या आहेत. पाकिस्तानी खेळाडूंना बाद करण्यापूर्वी हार्दिकने काळी जादूचा वापर केल्याचे चाहते सोशल मीडियामध्ये कमेंट करून सांगत होते. काही असो पण पाकिस्तानी फलंदाजाला बाद करण्यासाठी हार्दिकचा हा मंत्र कामी आला.
पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना 42.5 षटकात सर्वबाद 191 धावा करू शकला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा संघ डगमगून गेला.
भारताकडून बुमराह, सिराज, जडेजा, पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर शार्दुल ठाकूर यांचे खाते रिकामी राहिले. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आजम याने 50 धावा तर यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान यांनी 49 धावांची सर्वाधिक खेळी केली.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीयसंघाची प्लेईंग 11
शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
पाकिस्तानी फलंदाजांना बाद करण्यासाठी हार्दिक पंड्याने चेंडूवर फुकला मंत्र, पहा व्हायरल व्हिडीओ
Hardik Pandya before Imam ul haq’s wicket 🤔#HardikPandya #INDvsPAK #MatchHoTohZomato #RohitSharma𓃵 #siraj #viratkholi #WorldCup2023 pic.twitter.com/WtsM6nhqoo
— 🇮🇳 Brijesh Maurya🇮🇳 (@brijeshmauryasl) October 14, 2023
हेही वाचा:
ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..