‘हे जेलेबी-फाफडा मी खाऊ?’ हार्दिक पांड्याचा घमंडीपणा पुन्हा समोर, नाष्टा घेऊन आलेल्या माणसाला झापले; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

'हे जेलेबी-फाफडा मी खाऊ?' हार्दिक पांड्याचा घमंडीपणा पुन्हा समोर, नाष्टा घेऊन आलेल्या माणसाला झापले; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Hardik Pandya Viral Video:  सध्या आयपीएल स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता प्रत्येक खेळाडू स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. तर काही खेळाडूंना स्पर्धेपूर्वी जाहिराती मिळाल्या असून त्याच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. अशाच प्रकारे हार्दिक पांड्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात हार्दिक पांड्याला आपला राग कंट्रोल करणं कठीण झालं आहे.

याबरोबरच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सध्या चर्चेत आहे. गेल्या एक महिन्यापासून त्याच्या प्रशिक्षणाचे व्हिडिओ सातत्याने समोर येत होते. अशातच एकदिवसीय विश्वचषक 2023 पासून क्रिकेटपासून दूर असलेल्या पांड्याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. त्याचा हा व्हिडिओ शूटिंगदरम्यान काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हार्दिक पांड्या सध्या आयपीएलसाठी एक शूट करत असल्याचं व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पोस्टमध्ये सांगितलं आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये हार्दिक पांड्या सुरुवातीला शांत होता. पण डेक्सवर नाश्ता पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. जलेबी, फाफडा पाहून त्याने उपस्थित कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. “हे काय आहे. मी जलेबी कसं खाणार..काय ढोकला..हे सर्व काय आहे..भाई फिटनेस करायचं असतं. हे कसं खाणार मी..कोणी पाठवलं हे..” असं हार्दिक पांड्या म्हणत असताना कर्मचारी त्याला एडजस्ट करण्याची विनंती करतो. “अरे भाई एडजस्ट नाही होत. शेफ आणि न्यूट्रिशियन्स कुठे आहेत. ”

त्यानंतर कर्मचारी हार्दिक पांड्याला म्हणाला आहे की, शेफला लेट झालं. आजचा दिवस खा..जलेबी खा आणि पात्राही आहे. त्यावर हार्दिक पांड्या म्हणाला की, “भाऊ, कसं खाणार हे. डायरेक्टर साहेबांना सांगा हे नाही चालणार. हे खाऊन माझा स्टॅमिना बिघडून जाईल.”

'हे जेलेबी-फाफडा मी खाऊ?' हार्दिक पांड्याचा घमंडीपणा पुन्हा समोर, नाष्टा घेऊन आलेल्या माणसाला झापले; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

दरम्यान, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच हार्दिक पांड्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. हार्दिक पांड्या यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होता. पण 2022 आयपीएल स्पर्धेत त्याच्याकडे गुजरात टायटन्सचं कर्णधारपद आलं आणि तो सलग दोन वर्षे तेथून खेळला. पण ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेत थेट कर्णधारपद दिलं होतं. याबरोबरच आता टी20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचं कर्णधारपद संभाळणार आहे.


आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हे ही वाचा:-

भारतातील सर्वांत श्रीमंत असलेल्या ‘या’ 5 हिंदू मंदिरात संपूर्ण देशाचे कर्ज चुकवता येईल एवढा पैसा जमाय.

जाणून घ्या, कोण आहे चेन्नई सुपर किंग चा बाप ? 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *