न्युझीलंडविरुद्ध एकाच सामन्यात विजय मिळवताच हार्दिक पंड्यामध्ये आला अहंकार, “म्हणाला आता मी गोलंदाजी करणार नाही”
न्युझीलंडविरुद्ध एकाच सामन्यात विजय मिळवताच हार्दिक पंड्यामध्ये आला अहंकार, “म्हणाला आता मी गोलंदाजी करणार नाही”
भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे . न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील पहिला ट्वेंटी सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा सामना आज म्हणजे 20 तारखेला खेळवला गेला. ज्यात भारतीय संघाचे न्यूझीलंड वर तब्बल 65 धावांनी विजय मिळवत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवलीय.
प्रथम फलंदाजी करतांना भारतीय संघाकडून सुर्यकुमार यादवने दमदार शतक ठोकले. त्याने केवळ 51 चेंडूमध्ये नाबाद 111 धावांची झंझावाती खेळी केली. सूर्याच्या या खेळीच्या जोरावरच भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 192 धावांचे अवघड लक्ष ठेवले. भारतीय संघाकडून सूर्याच्या शतकासह श्रेयस अय्यर ने 13 आणि ईशान किशनने 36 धावांचे योगदान दिले.
प्रत्युतरात न्यूझीलंडचा संघ सुरवातीपासूनच लयीत दिसत नव्हता. कर्णधार केन विल्यमसन सोडता न्यूझीलंडचा इतर एकही खेळाडू लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्याचा परिणाम असा झाला की, न्यूझीलंड सर्वबाद होऊन केवळ 126 धावाच काढू शकले. आणि भारतीय संघाने हा सामना सहज खिशात घालून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
भारतीय संघाच्या विजयानंतर खेळाडूंनी मैदानावर चांगलाच जल्लोष केला. सूर्याचे शतक झाल्यानंतर सर्व ड्रेसिंगरूम त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करायला लागले होते. पण या सर्व जल्लोषानंतर भारतीय संघाचा नवा कर्णधार हार्दिक पंड्याने एक चर्चेत येण्यासारखे वक्तव्य केलंय.
https://twitter.com/SI41__/status/1594278300486369282?s=20&t=L5-N1eSCKajU1lIu6O6VOg
सामन्यानंतर हार्दिक पंड्याने केले मोठे वक्तव्य..
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा सामना ६५ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. या सामन्यात संघाच्या विजयाचा हिरो ठरलेल्या सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीचे कौतुक करताना भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने या विजयावर प्रचंड आनंद व्यक्त केला. त्याने गोलंदाजांचे कौतुकही केले आणि आजच्या विजयापेक्षा तुम्ही आणखी काही मागू शकत नाही, असे सांगितले. सगळ्यांनी खूप छान कामगिरी केली. पुढील सामन्यासाठी प्लेइंग 11 चे संकेत देताना तो म्हणाला,
KL Rahul, Harshal Patel, Hardik Pandya and Shreyas Iyer are the only four Indians to get out as hit-wicket in T20Is.
📸: Amazon Prime/Dinsey + Hotstar pic.twitter.com/rhCvVHQVGZ
— CricTracker (@Cricketracker) November 20, 2022
“यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. सर्वांची चमकदार कामगिरी पण निश्चितपणे सूर्याची खास खेळी. आम्ही १७०-१७५ असा स्कोअर केला असता. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि त्यातून आमची आक्रमक मानसिकताही दिसून येते. याचा अर्थ प्रत्येक चेंडूवर विकेट घेणे असा नाही, परंतु चेंडूवर आक्रमक होणे महत्त्वाचे आहे. पावसामुळे परिस्थिती खूपच ओली झाली होती, त्यामुळे त्याचे श्रेय गोलंदाजांना जाते.
पंड्या पुढे म्हणाला की, मी आजपर्यंत खूप गोलंदाजी केली आता मी यापुढे टीम इंडियासाठी स्वतः गोलंदाजी न करता इतर गोलंदाजी पर्याय शोधण्यावर माझा भर असणार आहे. भारतीय संघात युवा खेळाडू असून त्यांना गोलंदाज म्हणून तयार करण्याचे काम करावे लागणार आहे. आणि तीच जबाबदरी लक्षात घेता मी आता शक्य तेवढी कमी गोलंदाजी करणार आहे, असं हार्दिक म्हणाला..
प्रत्येकाला संधी देणे खूप कठीण.

हार्दिक पांड्याने स्पष्टपणे सांगितले की, फलंदाजाने वेळ आल्यावर गोलंदाजी करून विरोधी संघाला थोडा त्रास द्यावा असे मला वाटते. त्याचबरोबर आगामी सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना संधी देण्याच्या विषयावर उत्तर देताना पंड्या म्हणाला की, “असे नेहमीच घडत नाही की ते काम करेल पण मला अधिक फलंदाजांनी चेंडूला मदत करावी अशी माझी इच्छा आहे. मी त्यांच्याकडूनदोन्ही कामगिरी करण्यासाठी अपेक्षा करतो, जे ते आहेत.
हे असे वातावरण तयार करण्याबद्दल आहे जिथे ते सर्व आनंदी ठिकाणी आहेत. मी या संघात अनेक वेळा पाहतो की सर्व खेळाडू एकमेकांच्या यशावर आनंदी असतात. आणि हे महत्वाचे आहे. मला संघातील प्रत्येकाला संधी द्यायची आहे पण हा अजून एक सामना आहे त्यामुळे थोडा कठीण आहे.”
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..