तब्बल एवढ्या कोटीच्या घरात राहतात हार्दिक पांड्याआणि कृणाल पांड्या, शेजारी आहे बॉलीवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री..
तब्बल एवढ्या कोटीच्या घरात राहतात हार्दिक आणि कृणाल पांड्या, शेजारी आहे बॉलीवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री..
क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या त्यांच्या अत्यंत लॅव्हिश राहणीमानासाठी जाणले जातात. मागच्या आयपीलमध्ये दुबईच्या विमानतळावर त्यांना कोटींची घड्याळे आणताना पकडण्यात आले. त्यांनी कोणताही कर दिला नव्हता म्हणून त्यांना काही काळ तिथे चौकशीसाठी थांबले होते.
भारतीय क्रिकेट संघ असो अथवा आयपीएलमध्ये खेळून दोन्ही बंधू बक्कळ पैसे कमावतात. दोघांच्या स्फोटक फलंदाजी आणि गोलंदाजीने डोळ्याचे अक्षरशः पारणे फिटते. महागड्या गाड्या, घड्याळे आणि इतर काही गोष्टींच्या बाबतीत पांड्या बंधू हे प्रसिद्ध आहेत. हार्दिक पांड्याला महागड्या घड्याळांचे विशेष वेड आहे.
View this post on Instagram
या दोन्ही बंधूनी आता मुंबईमध्ये एक आलिशान ८ BHK घर घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. ३,८३८ स्केवर फुटांचं हे घर आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी यांच्या शेजारीच पांड्या बंधूनी घर घेतलं आहे. पांड्या बंधूनी घेतलेल्या रुस्तमजी पॅरामाउंटमध्ये घेतलेल्या घराची किंमत तब्ब्ल ३० कोटी रुपये आहे असे वृत्त डीएनएने दिलं आहे.
हार्दिक आणि कृणाल पांड्याच्या नव्या घरामध्ये जिम, गेमिंग झोन, स्विमिंग पूल तसंच त्यांच्या अपार्टमेंटमध्ये वैयक्तिक थिएटरही आहे. नुकत्याच झालेल्या भारत-विरुद्ध श्रीलंका सिरीजमध्ये दोन्ही बंधू खेळले होते.

२ वन-डे सामन्यांमध्ये कृणालला एकही विकेट घेतला आली आणि फक्त ३५च रन करता आले. शेवटच्या सामन्यानंतर कृणाल पांड्यावर भारतीय क्रिकेटप्रेमींकडून पराभवाचे खापर फोडण्यात आले आणि सोशल मीडियावर देखील त्याला ट्रोल करण्यात आले.
असे असले तरीदेखील पांड्या बंधुंसारखे आलिशान जीवन जगण्याचे स्वप्न अनेकजण पाहत आहेत. मध्यमवर्गीय घरातून आलेल्या पांड्या बंधूनी यशाचे उंच शिखर गाठले आहे हे मात्र नक्की.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…