Cricket News

IND vs NZ:धर्मशाळाची खेळपट्टी कशी आहे? न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पडणार धावांचा पाऊस? पहा पीच रिपोर्ट

IND vs NZ: आयसीसी विश्वचषक 2023 (World Cup 2023) मधील 21व्या सामन्यांमध्ये भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात लढत रंगणार आहे. हा सामना धर्मशाळाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे. स्पर्धेत दोन्ही संघांनी प्रत्येकी चार-चार सामने जिंकले आहेत. या सामन्यात दोन्हीही संघ एकमेकाचा विजय रथ रोखण्याचा प्रयत्न करतील.

2016 मध्ये याच मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्याची न्यूझीलंडकडे संधी चालून आली आहे. न्यूझीलंडने या स्पर्धेत सलग चार सामने जिंकत गुणतालिकेत टॉप वर पोहोचला आहे. नेट रन रेटच्या आधारावर न्युझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

IND vs NZ: हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमुळे बिघडणार टीम इंडियाचे संतुलन, न्यूझीलंडविरुद्ध एक नाही तर 3 खेळाडूंची होणार आदलाबदल..

IND vs NZ: हेड टू हेड 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये आत्तापर्यंत 116 सामने झाले आहेत. त्यापैकी न्यूझीलंडने 50 तर भारताने 58 सामन्यात विजय मिळवला आहे, तर सात सामने टाय झाले आहेत. 1975 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ पहिल्यांदा आपसात भिडले होते. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ सेमी फायनल मध्ये एकमेकांविरुद्ध खेळले होते.

या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. त्या पराभवची सल अजून देखील भारतीय संघाला जाणवत आहे. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी भारतीय संघ आता तयार झाला आहे.

IND vs NZ: कशी असेल खेळपट्टी (IND vs NZ Dharamshala stadium pitch report)

धर्मशाळाची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजाला अनुकूल आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून कोणताही कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.  या मैदानावर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ सर्व सामने जिंकले आहेत. खेळपट्टीवर फलंदाजाने काही वेळ काढली तर येथे धावा देखील बनवू शकतात.

हा सामना दिवस रात्र होणार असल्याने येथील हवेत गारवा पाहायला मिळतो. हे खेळपट्टी वेगवान गोलंदाजासह फिरकीला देखील अनुकूल आहे. धर्मशाळाचे मैदान हे उंच टेकडीवर असल्याने येथे पाऊस पडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. जर पावसामुळे उद्याचा सामना झाला नाही तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण बहाल करण्यात येईल. 

भारतीय संघातील फलंदाज आणि न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज अशी टक्कर उद्याच्या सामन्यात पाहायला मिळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) संघातील फलंदाज आणि गोलंदाज दोघेही जबरदस्त फॉर्मात असल्याने क्रिकेट प्रेमींना एक रोमांचकारी सामना पाहायला मिळेल. आतापर्यंत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने न्यूझीलंडवर केवळ तीनच विजय मिळवले आहेत.

IND vs NZ

रोहित सेना न्यूझीलंडविरुद्धचा आतापर्यंतचा विश्वचषकातील पराभवाचा इतिहास पुसून टाकण्यासाठी शर्तीने लढा देईल, अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींना आहे.

असे असू शकतात दोन्ही संघ (IND vs NZ  probable playing 11)

IND vs NZ : Team India Probable playing 11)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, आर अश्विन, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज


हेही वाचा:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button