VIRAL VIDEO: मुंबई इंडियन्सने विकत घेताच भारतीय महिला संघाची कर्णधार ‘हरमनप्रीत कौर’साठी संघाने केला जल्लोष , व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…
पहिल्यावहिल्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावात पाच फ्रँचायझींनी अव्वल आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर काल बोली लावली. ज्यात भारतीय संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना सर्वांत महागडी खेळाडू ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तिला 3.4 कोटींची बोली लावून आपल्या संघात सहभागी करून घेतले.
भारतीय उपकर्णधार स्मृती मानधना ही खेळाडूंच्या मार्की यादीतून सर्वाधिक कमाई करणारी खेळाडू ठरली आहे. दुसरीकडे, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला सर्वात यशस्वी आयपीएल फ्रँचायझी- मुंबई इंडियन्सने आपल्या संघात सामील करून घेतले.
पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स, ज्यांनी डब्ल्यूपीएलमध्ये त्यांचा संघ विकत घेतला, त्यांना 1.8 कोटी रुपयांमध्ये हरमनप्रीत कौरला संघात सामील करून घेतले. विशेष म्हणजे, भारतीय पुरुष संघाचा कर्णधार आणि भारतीय महिला संघाचा कर्णधार आता भारतीय T20 लीगमधील मुंबईस्थित फ्रँचायझीचा एक भाग आहे.

संपूर्ण भारतीय T20I संघ, जी सध्या T20 विश्वचषक 2023 साठी दक्षिण आफ्रिकेत आहेत, काल त्या सार्वजन मिळून एकत्रितपणे लिलावाचे प्रसारण पाहत होत्या. प्रथम स्मृती मंधानावर लागलेल्या बोलीने सर्वांनी आनंदाने तिचे अभिनंदन केले. त्यानंतर हरमनप्रीत कौरवर मुंबई इंडियन्सने बोली लावून संघात सहभागी करून घेतल्यावर तिच्या आनंदाला पार उरला नाही.
लिलावाच्या आधीच तिने आपण मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे तिने आनंदोत्सव साजरा करण्यास सुरवात केली. संघातील इतर खेळाडूही तिच्या या आंदोत्सवात सहभागी झाल्या. ज्याच्या व्हिडीओ सध्या आता सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
पहा व्हायरल होत असलेला व्हिडीओ..
Celebrations of Harmanpreet Kaur and players when Mumbai Indians picked her in WPL auction – This is beautiful!! pic.twitter.com/h1n65wLKIc
— CricketMAN2 (@ImTanujSingh) February 13, 2023
या 5 गोलंदाजांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वांत जास्त ‘नो बॉल’ फेकलेत..