- Advertisement -

एक चुकीची बातमी मिडीयाने लावल्यामुळे ‘या’ खेळाडूचे करिअर संपण्याच्या मार्गावर आले होते, आज पुन्हा आयपीएलमध्ये संधी मिळालीय…

0 0

एक चुकीची बातमी मिडीयाने लावल्यामुळे ‘या’ खेळाडूचे करिअर संपण्याच्या मार्गावर आले होते, आज पुन्हा आयपीएलमध्ये संधी मिळालीय…


आयपीएल 2023 मध्ये आपणास दररोज एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक देखील आयपीएल 2023 चा आनंद घेताना दिसत आहेत. आयपीएलमध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडतो. जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये अनेक खेळाडूंसाठी नशिबाचे दरवाजे उघडतात, तर दुर्दैवाने अनेक खेळाडूंची निवड होत नाही.

या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कश्या पद्धतीने एएनआयच्या चुकीच्या बातमीमुळे एका खेळाडूचे करिअर उद्ध्वस्त झाले आणि त्यामुळे कोणत्याही आयपीएल संघाने या खेळाडूला खरेदी करण्यास नकार दिला. या खेळाडूचे नशीब एवढे वाईट होते कि काहीही चूक नसतांना त्याला तब्बल 5 वर्ष आयपीएल पासून लांब रहाव लागलं.. चला तर जाणून घेऊया नक्की कोण आहे तो खेळाडू?

आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत त्या खेळाडूचे नाव आहे ‘हरप्रीत सिंग भाटिया'(harpreet singh bhatia). क्रिकेटच्या इतिहासातील दुर्भाग्याशाली खेळाडूंमध्ये भाटीयाचे नाव सुद्धा घेतले जाते.

खेळाडू

कोण आहे ‘हरप्रीत सिंग भाटिया'(harpreet singh bhatia)?

छत्तीसगडच्या डोमेस्टिक टीममधून धमाकेदार परफॉर्मन्स देणाऱ्या हरप्रीत सिंगने 2010 मध्ये आयपीएलमध्ये  पदार्पण केले. हरप्रीत केकेआरकडून  2 वर्षे आयपीएल खेळला, त्यानंतर त्याने पुणे वॉरियर्सकडूनदेखील तो मैदानात उतरला होता.. 2017 मध्ये त्याला आरसीबीकडून खेळण्याची संधी मिळाली. यानंतर पंजाब किंग्सने 2023 मध्ये हरप्रीतला त्यांच्या संघाचा भाग बनवले आणि तो देखील चमकदार कामगिरी करत आहे.

चुकीच्या बातम्यामुळे’हरप्रीत सिंग भाटिया'(harpreet singh bhatia) चे झाले मोठे नुकसान..

 

खरं तर, आयपीएल लिलावाच्या दोन दिवस आधी मनप्रीत नावाच्या खेळाडूचा दुबईत अपघात झाला. पण मीडियाने मनप्रीतऐवजी हरप्रीतचे नाव लिहिले आणि या गैरसमजामुळे हरप्रीतला कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतले नाही. हरप्रीतला फेक न्यूजचा शिकार व्हावे लागले, त्यानंतर पुनरागमन करण्यासाठी त्याला पाच वर्षे लागली.

मात्र 5 वर्षानंतर सुद्धा त्याने आयपीएलमध्ये शानदार पुनरागमन केली आणि आज तो पंजाब किंग्जकडून शानदार खेळी खेळत आहे.

खेळाडू harpreet singh bhatia
harpreet singh bhatia

 अशी आहे हरप्रीत सिंग भाटियाची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी..

हरप्रीतने (harpreet singh bhatia) देशांतर्गत क्रिकेटमधील विजय ट्रॉफीमध्ये चमकदार खेळ दाखवला, त्यानंतर फ्रँचायझीने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आणि त्याला आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले. हरप्रीतने या मोसमात विजय हजारे ट्रॉफीच्या 7 सामन्यात 516 धावा केल्या. यादरम्यान त्याने 2 शतके आणि 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याचवेळी रणजी ट्रॉफीमध्येही त्याची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. त्याने 11 डावात 838 धावा केल्या. यादरम्यान त्याने एक द्विशतक आणि तीन शतके झळकावली आहेत.


हेही वाचा:

पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!

Leave A Reply

Your email address will not be published.