- Advertisement -

हॅरी ब्रूकने कोलकाताविरुद्ध केवळ ५५ चेंडूत शतक झळकावले, इडन गार्डन्सवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.

0 0

IPL 2023 च्या सिझन मद्ये हॅरी ब्रूकची अविस्मणीय बॅटिंग पाहायला मिळाली. या खेळाडूने 55 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 3 षटकार मारले.

सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 4 गडी गमावून 228 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून हॅरी ब्रूकने शानदार शतक झळकावले. हॅरी ब्रूकने 55 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 3 षटकार मारले.

तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने शानदार खेळी केली. एडन मार्करामने 26 चेंडूत 50 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 5 षटकार मारले. याशिवाय अभिषेक शर्माने झटपट खेळी केली. अभिषेक शर्माने 17 चेंडूत 32 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. तर हेन्री क्लासेनने 6 चेंडूत नाबाद 16 धावा करत शानदार फिनिशिंग केली. मात्र, मयंक अग्रवाल आणि राहुल त्रिपाठीसारख्या फलंदाजांनी निराशा केली. दोन्ही फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले.

कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर अष्टपैलू आंद्रे रसेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. मात्र, आंद्रे रसेलला दुखापतीमुळे संपूर्ण 4 षटके टाकता आली नाहीत. या खेळाडूने 2.1 षटकात 22 धावांत 3 खेळाडू बाद केले. आंद्रे रसेलने मयंक अंगरवाल, राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा यांना आपला बळी बनवले.

Leave A Reply

Your email address will not be published.