6,4,4,2,6,6.. शेवटच्या षटकात हॅरी ब्रूकने आंद्रे रसलची केली धुलाई, एकाच षटकात एवढ्या धावा ठोकत मिळवला शानदार विजय; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

6,4,4,2,6,6.. शेवटच्या षटकात हॅरी ब्रूकने आंद्रे रसलची केली धुलाई, एकाच षटकात एवढ्या धावा ठोकत मिळवला शानदार विजय; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

ENG vs WI हॅरी ब्रूक:  वेस्ट इंडिज आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसरा सामना काल( 16 डिसेंबर) रोजी सेंट जॉर्ज येथे खेळला गेला. या सामन्यात इंग्लिश संघाने एक चेंडू शिल्लक असताना सात गडी राखून मोठा विजय मिळवला. सामन्यादरम्यान एकेकाळी वेस्ट इंडिजचा संघ सामना सहज जिंकताना दिसत होता मात्र शेवटच्या वेळी हॅरी ब्रूकने अतिशय रोमांचक रित्या वेस्ट इंडीजच्या हातातील विजय हिसकावून घेतला.

 ENG vs WI: शेवटच्या षटकात 21 धावांची गरज असतांना हॅरी ब्रूकने दाखवला रोखठोक खेळ.

इंग्लंडला शेवटच्या षटकात २१ धावांची गरज होती. फिल सॉल्ट हॅरी ब्रूकसोबत मैदानात उपस्थित होते. तर अनुभवी अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल वेस्ट इंडिजसाठी शेवटचे षटक टाकत होता. रसेलच्या या षटकातील पहिल्या चेंडूवर ब्रूकने लेग साइडला शानदार चौकार मारला. तो इथेच थांबला नाही. पुढच्या दोन्ही चेंडूंवर त्याने चौकाराच्या बाहेर षटकार ठोकले. त्याने चौथ्या चेंडूवर दोन धावा काढल्या, तर पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला आणि एक चेंडू शिल्लक असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

6,4,4,2,6,6.. शेवटच्या षटकात हॅरी ब्रूकने आंद्रे रसलची केली धुलाई, एकाच षटकात एवढ्या धावा ठोकत मिळवला शानदार विजय; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

ब्रूकने अखेरच्या षटकांमध्ये रसेलविरुद्ध खेळलेल्या उत्कृष्ट खेळीचे सर्वजण कौतुक करत आहेत. आपल्या संघासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या मधल्या फळीतील फलंदाजाने सामन्यादरम्यान केवळ सात चेंडूंचा सामना केला. दरम्यान, तो 442.85 च्या दराने 31 नाबाद धावा करण्यात यशस्वी ठरला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि चार उत्कृष्ट षटकार आले.

ब्रूकच्या आधी सलामीवीर फिल सॉल्टने डावाला सावरण्याचे  काम केले. शेवटच्या क्षणापर्यंत तो मैदानात उभा राहिला. या काळात त्याने इंग्लिश संघासाठी एकूण 56 चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्याने 194.64 च्या स्ट्राईक रेटने 109 धावांचे नाबाद शतक झळकावले. दरम्यान, त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि नऊ उत्कृष्ट षटकार आले.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सेंट जॉर्जमध्ये नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कॅरेबियन संघाने निर्धारित षटकात 6 गडी गमावून 222 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने एक चेंडू शिल्लक असताना तीन विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले.

वेस्ट इंडिजकडून या सामन्यात निकोलस पूरनने सर्वाधिक धावा केल्या. आपल्या संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 45 चेंडूत 82 धावांचं अर्धशतक झळकावलं. इंग्लिश संघासाठी सॉल्टने (109*) शतक झळकावले, तर कॅप्टन बटलरने (51) अर्धशतक झळकावले.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *