मोहम्मद शमी: एकीकडे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये चमकदार कामगिरी करत असताना दुसरीकडे त्याची पत्नी शमीवर एकापाठोपाठ एक गंभीर आरोप करत आहे.
मोहम्मद शमीने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेट घेतल्या होत्या आणि शमी आता विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. एकीकडे संपूर्ण जग शमीच्या कामगिरीचे कौतुक करत आहे तर दुसरीकडे त्याची पत्नी हसीन जहाँ शमीवर आरोप करण्यापासून परावृत्त होत नाही.
हसीन जहाँचे मोहम्मद शमीवर गंभीर आरोप
नुकतेच मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचे ताजे विधान समोर आले असून त्यात तिने शमीवर नवा आरोप केला आहे. हसीन जहाँ म्हणाली की शमी खेळाडूंना पैसे देतो आणि त्यांना बाद करतो. मात्र, या विधानात किती तथ्य आहे, हे कोणालाच माहीत नाही. हसीन जहाँच्या या वक्तव्यानंतर चाहते सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका करत आहेत. एका युजरने पोस्ट शेअर करत लिहिले की, त्याने अनेक महिला पाहिल्या आहेत पण इतक्या विषारी नाहीत.
यापूर्वी हसीनने केला होता शमिवर मॅच फिक्सिंग आणि देशाचा विश्वासघात करण्याचा आरोप.
हसीन जहाँने शमीवर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी हसीनने त्याच्यावर मॅच फिक्सिंग आणि देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. काही काळापूर्वी या सगळ्याचा परिणाम शमीवर नक्कीच झाला होता.अशा बिनबुडाच्या आरोपांनंतर शमी काही दिवस डिप्रेशनमध्ये गेला होता, पण आता शमी या सगळ्यातून बाहेर आला आहे आणि भारतीय संघासाठी सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. प्रत्येकजण त्याच्या कामगिरीचे कौतुक करत आहे.
महिलाए तो बहुत देखी पर इतनी जहरीली….🐍 👇
“शमी पैसे देकर खिलाड़ियों को आउट करता है : हसीन जहां” pic.twitter.com/Hg2q6j2C0E
— INDIA गठबंधन (@Jeetuburdak) November 16, 2023
IND vs AUS: अंतिम सामन्यात भारतासमोर असेल ऑस्ट्रोलियाचे आव्हान, कोण ठरणार विश्वविजेता?
विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आता चाहत्यांना मोहम्मद शमीकडून उपांत्य फेरीतील कामगिरीची अपेक्षा असेल. एकीकडे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये चमकदार कामगिरी करत असताना दुसरीकडे त्याची पत्नी शमीवर एकापाठोपाठ एक गंभीर आरोप करत आहे.
मोहम्मद शमीने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेट घेतल्या होत्या आणि शमी आता विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. एकीकडे संपूर्ण जग शमीच्या कामगिरीचे कौतुक करत आहे तर दुसरीकडे त्याची पत्नी हसीन जहाँ शमीवर आरोप करण्यापासून परावृत्त होत नाही.
हेही वाचा:
- ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.
- .शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..
- टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..