नाशिक शहरातील जेल रोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आंतरराष्ट्रीय महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा सुरू असताना ३२ वर्षीय तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना एनबीटी महाविद्यालयाच्या मैदानावर घडली आहे. या महाविद्यालयात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
आकाश रवींद्र वाटेकर (Akash Vatekar) असं मृत झालेल्या तरुणाच नाव आहे. क्रिकेट खेळत असताना तो गोलंदाजी करत होता. त्यावेळी तो अचानक जमिनीवर पडला. त्याला त्वरित रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळताना त्याला हृदय विकाराचा झटका आला होता. आकाशच्या अचानक जाण्याने त्याचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांवर शोककळा पसरली आहे.
अशी माहिती समोर येत आहे की, क्रिकेट खेळण्यापूर्वी त्याला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे मित्रांनी त्याला जवळच्या मेडिकलमधून गोळी आणून दिली. गोळी घेतल्यानंतर त्याला काहीकाळ बरे वाटले. मात्र क्रिकेट खेळायला सुरुवात करताच, त्याला हृदय विकाराचा झटका आला.
हे ही वाचा..
ठरलं तर ‘या’ दिवशी होणार जसप्रीत बुमराहचे पुनरागमन! स्वतः रोहित शर्माने केला खुलासा..