World Cup Records: भारतात सध्या 2023 चा विश्वचषक (World Cup 2023) सुरू आहे. आयसीसीद्वारा आयोजित आतापर्यंतच्या 12 विश्वचषक स्पर्धेत वेगवेगळे विक्रम रचले गेले आहेत. काही विश्वचषकांमध्ये खेळाडूंनी प्रत्येक विकेटसाठी वेगवेगळी भागीदारी रचली गेली आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हालाविश्वचषकाच्या इतिहासातील काही सर्वोच्च विक्रमी भागीदारी (World Cup Records) करणाऱ्या जोड्याविषयी माहिती देणार आहोत. त्याची माहिती पुढील प्रमाणे.
या 9 जोड्यांनी वर्ल्डकप मध्ये केलीय विक्रमी भागीदारी..
1.उपल तरंगा आणि तिलकरत्ने दिलशान
2011 साली भारतात झालेल्या विश्वचषकात श्रीलंकेचे सलामवीर उपल तरंगा आणि तिलकरत्ने दिलशान यांनी पहिल्या विकेटसाठी 282 धावांची भागीदारी रचली. झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात त्यांनी हा कारनामा केला. भारत आणि श्रीलंका यांच्यात वानखेडे स्टेडियम वर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंका उपविजेता राहिला.
२.क्रिस गेल आणि मार्लेन सॅम्युल्स
2015 साली झालेल्या विश्वचषकात वेस्टइंडीज चा विस्फोट फलंदाज क्रिस गेल आणि मार्लेन सॅम्युल्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी 372 धावांची विक्रमी भागीदारी केली. या दोन्ही कॅरिबियन खेळाडूंनी झिंबाब्वेच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपून काढले होते.वर्ल्डकपच्या इतिहासातील ही एक सर्वोच्च भागीदारी होती.
३. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड
1999 च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी तिसऱ्या विकेटसाठी केनियाविरुद्ध खेळताना 237 धावांची भागीदारी रचली होती. या विश्वचषकात सचिन, राहुल आणि सौरव या त्रिमूर्ती ची बॅट चांगलीच तळपली होती. तरीही भारतीय संघाला या विश्वचषकामध्ये दमदार कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले.
View this post on Instagram
४.ब्रॅड हॉज आणि मायकल क्लार्क
वेस्टइंडीज येथे 2007 साली झालेल्या विश्वचषकात ब्रॅड हॉज आणि मायकल क्लार्क यांनी चौथ्या विकेटसाठी नेदरलँड विरुद्ध खेळताना 204 धावांची भागीदारी केली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव करत विश्वचषक जिंकला.
५.डेविड मिलर आणि जे पी डुमिनी
ऑस्ट्रेलिया येथे 2015 साली झालेल्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेविड मिलर आणि जे पी डुमिनी यांनी पाचव्या विकेटसाठी झिम्बाब्वे विरुद्ध खेळताना 256 धावांची विक्रमी भागीदारी रचली. मायदेशात झालेल्या या विश्वचषक स्पर्धेत अंतिम ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.
६.केविन ओबेरायन आणि अलेक्स क्युसेक
2011 साली भारतात झालेल्या विश्वचषकात नेदरलँड चा फलंदाज केविन ओबेरायन आणि अलेक्स क्युसेक यांनी सहाव्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी करण्यात यशस्वी ठरले. या धमाकेदार खेळीच्या जोरावरच नेदरलँड ने इंग्लंडचा पराभव केला. या अविश्वासने खेळाच्या जोरावर मिळवलेल्या विजयामुळे नेदरलँड चा संघ रातोरात स्टार झाला.
७.महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा
2019 च्या विश्वचषकामध्ये महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी सातव्या विकेटसाठी न्यूझीलंड विरुद्ध खेळताना 116 धावांची भागीदारी केली होती. या सामन्यात मार्टिन गुप्टिलने अचूक थ्रो फेकत महेंद्रसिंग धोनीला धावबाद करत भारताच्या तोंडून विजयाचा घास हिसकावला. हेही वाचा: महेंद्रसिंह धोनीचे चेन्नईसुपर किंग्स विरुद्ध खेळलेल्या 5 सर्वांत मोठ्या खेळी
८ .कपिल देव आणि सय्यद किरमाणी
1983 साली झिम्बाबे विरुद्ध खेळताना माजी कर्णधार कपिल देव आणि सय्यद किरमाणी यांनी नव्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली होती. गेल्या कित्येक वर्षापासून हा विक्रम अबाधित आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता.
९.अँडी रॉबर्ट्स आणि ज्वेल गार्नर
1983 साली वेस्टइंडीज चा खेळाडू अँडी रॉबर्ट्स आणि ज्वेल गार्नर यांनी भारताविरुद्धच्या सामन्यात दहाव्या विकेटसाठी 71 धावांची खेळी केली होती. दहाव्या क्रमांकासाठी केलेली ही भागीदारी देखील विश्वचषक स्पर्धेतील सर्वांत मोठी भागीदारी आहे.
PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..