VIRAL VIDEO: “हा तर डुप्लीकेट सूर्या” डाव्या बाजूला आडवा पडून ‘हेन्री निकोलस’ने मारला जबरदस्त षटकार, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
मंगळवारी इंदूरमध्ये खेळल्या जात असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम वनडेमध्ये टीम इंडियाने शानदार फलंदाजी करत 50 षटकात 385 धावा केल्या. यात रोहित शर्मा-शुबमन गिलचे शानदार शतक आणि हार्दिक पांड्याचे धडाकेबाज अर्धशतक यांचा समावेश होता.
टीम इंडियाकडून मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या किवी संघाचा फलंदाज हेन्री निकोल्सने 40 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार लगावत 42 धावा केल्या. निकोल्सने आपल्या शानदार खेळीत दोन षटकार ठोकले. यादरम्यान त्याने सूर्यकुमार यादवच्या शैलीत इतका जबरदस्त षटकार ठोकला की सर्व पाहतच राहिले.

शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार ठोकला.
शार्दुल ठाकूरच्या षटकात डावखुरा फलंदाज हेन्री निकोलसने जबरदस्त फलंदाजी केली. शार्दुल आठवे षटक टाकायला आला तेव्हा त्याने पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. परंतु निकोलसने बॉलच्या लेन्थपर्यंत जाऊन गुडघ्यावर बसून जमिनीवरून चेंडू उचलला आणि थर्ड मॅनच्या दिशेने असा गदार सिक्सर मारला की सगळे बघतच राहिले. सूर्यकुमार यादवच्या शैलीत मारलेला हा षटकार पाहून भारतीय तंबूमधील खेळाडू आणि इतर सदस्यही अवाक् झाली . त्याचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
निकोलसने 40 चेंडूचा सामना करत शानदार 42 धावांची खेळी केली.
कुलदीपने शानदार गुगलीवर हेन्री निकोलसला केले बाद..
All to play for after an electric ⚡ Powerplay!
Will #Kiwis take the attack on to the #TeamIndia bowlers?#BelieveInBlue and back #TeamIndia in the Final Mastercard #INDvNZ ODI only on Star Sports & Disney+Hotstar. pic.twitter.com/zGrHmVL5xm
— Star Sports (@StarSportsIndia) January 24, 2023
कुलदीपच्या गुगलीवर निकोलसचा फटका बसला आणि चेंडू पॅडला लागला. चेंडू स्टंपला जाऊन आदळणार असल्याचे रिव्ह्यूमध्ये स्पष्टपणे दिसत होते. अशा स्थितीत त्याला शानदार खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. निकोलस बाद झाल्यानंतर किवी संघा 295 धावावर सर्वबाद झाला आणि भारतीय संघाने हा सामना 90धावांनी जिंकला.
हेही वाचा:
या महिलेने हिटलरच्या तावडीतून 25000 ज्यू वंशाच्या मुलांची सुटका करून त्यांना नवजीवन दिले होते..