आयपीएल मध्ये विजयाचे शतक साजरे करणारे हे आहेत 7 संघ; मुंबई इंडियन्सचा संघ टॉपवर!

आयपीएल मध्ये विजयाचे शतक साजरे करणारे हे आहेत 7 संघ; मुंबई इंडियन्सचा संघ टॉपवर!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

2008 पासून सुरुवात झालेल्या आयपीएल स्पर्धेत अनेक रोमांचकारी सामने पाहायला मिळाले. लीग मधील प्रत्येक संघाने दरवर्षी कोणता तरी. वेगळा विक्रम केला आहे. गेल्या सोळा वर्षात मुंबई इंडियन्स आणि सीएसके ने प्रत्येकी पाच वेळा आयपीएलचा चषक जिंकला आहे तर सनरायझर्स हैदराबाद आणि केकेआर च्या संघाने प्रत्येकी दोन वेळा आयपीएल चषकावर नाव कोरले तर राजस्थान रॉयल्स ला एकदाच हा चषक जिंकता आला. आज आपण आयपीएल मध्ये सर्वाधिक सामने कोणत्या संघाने जिंकले आहेत याची माहिती घेणार आहोत.

IPL Records: आयपीएलच्या इतिहासात हा गोलंदाज ठरलाय सर्वात महागडा गोलंदाज; यादीत भारतीय गोलंदाज सर्वाधिक!

हे आहेत आयपीएलमध्ये  सर्वाधिक सामने जिंकणारे संघ.

1. मुंबई इंडियन्स (MI)

आयपीएल मधील सर्वांची फेवरेट टीम मुंबई इंडियन्स 2008 पासून आयपीएल मध्ये खेळतेय. या संघाने 247 सामन्यात 138 सामने विजयी झाले आहेत. आयपीएलच्या सुरुवातीला या संघाने काही खास कामगिरी केली नाही मात्र त्यानंतर या संघाने मागे वळून कधीच पाहिले नाही. तब्बल पाच वेळा या संघाने आयपीएलचा चषक उंचावला आहे. यंदा मात्र या संघाने आपला सेनापती बदलला असून रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली आहे.

Cricket 11

2.चेन्नई सुपर किंग्स (CSK)

चेन्नई सुपर किंग्सचा संघ दोन वर्ष आयपीएल मध्ये खेळू शकला नाही. तरीही या संघाने आपल्या कामगिरीचा आलेख चढता ठेवला आहे. या संघाने आतापर्यंत 225 पैकी 131 सामन्यात विजय मिळवत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांचे यादीत दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे.

3. कोलकत्ता नाईट रायडर (KKR)

शाहरुख खानच्या कोलकत्ता नाईट रायडर संघाने दोन वेळा आयपीएल चषकावर आपले नाव कोरले आहे. या संघाने 237 पैकी 119 सामन्यात विजय संपादन केला. गौतम गंभीर हा या विजयी संघाचा कर्णधार होता. त्याने आपल्या संघाला सलग दोन वर्ष आयपीएल चषक जिंकून दिला.

4.आरसीबी (RCB)

आयपीएल मध्ये विजयाचे शतक साजरे करणारे हे आहेत 7 संघ; मुंबई इंडियन्सचा संघ टॉपवर!

आरसीबी चा संघ 2008 पासून आयपीएल मध्ये खेळतोय मात्र एकदाही या संघाला आयपीएलचा चषक जिंकता आला नाही. मातब्बर खेळाडू असून देखील ही या संघाला जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. यंदा त्यांच्याकडून जबरदस्त कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना आहे. आरसीबीने आतापर्यंत 241 पैकी 114 सामन्यात विजयी संपादन केला आहे.

5.दिल्ली कॅपिटल्स (DC)

दिल्ली कॅपिटल्सचा संघ देखील 2008 पासून आयपीएल मध्ये खेळतोय. मात्र या संघाला एकदाही आयपीएलचा चषक जिंकता आला नाही. मागील वर्षी या संघाने विजयाचे शतक पूर्ण केले. दिल्ली कॅपिटल्स ने आतापर्यंत आयपीएलमध्ये 238 सामने खेळले असून केवळ 105 सामने त्यांना जिंकता आले यंदा हा संघ ऋषभ पंत च्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.

IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील 'हे' नवे खेळाडू कोणत्याही संघाला देऊ शकतात जबरदस्त टक्कर!

6.पंजाब किंग्स (PBKS)

प्रीती झिंटाच्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाने आयपीएल मध्ये 232 पैकी 104 सामन्यात विजय मिळवला आहे. यंदा हा संघ शिखर धवन च्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. या संघाने कामगिरीत सातत्य राखले नाही.

73राजस्थान रॉयल्स  (Rajasthan Royals)

राजस्थान रॉयल्स संघ आयपीएल मध्ये 2008 पासून खेळतोय. आयपीएलचा पहिला विजेता म्हणून या संघाकडे पाहिले जाते. त्यानंतर या संघाला विशेष अशी कामगिरी करता आली नाही. आयपीएल मधील 206 सामन्यात केवळ 101 सामन्यात त्यांना विजय मिळवता आला. आयपीएलच्या पहिल्या हंगामानंतर या संघाने जेमतेम कामगिरी केली आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *