कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे हे आहेत खेळाडू: वाचा पहिल्या स्थानावर कोण आहे?

0

अलीकडच्या काळातील काही धडाकेबाज खेळाडूंनी आपल्या आक्रमक खेळणे कसोटी क्रिकेटचे रूप पालटून टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये संथ खेळणे आता बंद झाले असून त्याचे निकाल देखील लवकरात लवकर येत आहेत. आज आपण कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान अर्धशतक कोण ठोकले आहे याची माहिती घेणार आहोत.

पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह उल हक याच्या नावे टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आहे. पाकिस्तानच्या संघात मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या या खेळाडूने 2014 मध्ये अबुधाबी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. गेल्या दहा वर्षापासून हा विक्रम अबाधित आहे. त्याने आता क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर तो काही काळ पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

डेव्हिड वॉर्नर याने 2017 मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळताना अवघ्या 23 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले होते. सिडनीच्या मैदानावर त्याने हा पराक्रम केला होता. वॉर्नर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असून केवळ व्यावसायिक t20 लीग खेळत आहे. आयपीएल मध्ये सध्या तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून क्रिकेट खेळतोय.

दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज जॅक केलीस याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध केपटाऊन कसोटी सामन्यात 2005 मध्ये अवघ्या 24 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. 21व्या शतकातला तो एक महान अष्टपैलू खेळाडू मानला गेला. मात्र त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याला एकदाही विश्वचषक जिंकून देता आला नाही. निवृत्तीनंतर तो आयपीएल मध्ये केकेआर संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते.

वेस्टइंडीजचा फिरकीपट्टू शेन शिलिंगफोर्ड याने 2014 मध्ये किंग्स्टन कसोटीत 25 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्याने वेस्टइंडीज संघाकडून 16 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत. न्यूझीलंड विरुद्ध हा कारनामा केला होता. कौशल्य असून देखील या क्रिकेटपटूला आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द वाढवता आली नाही.

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने बेंगलोर कसोटी 2005 मध्ये भारताविरुद्ध 26 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा शाहिद आफ्रिदीचा विक्रम होता. आफ्रिकेने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. आफ्रिदी नेहमीच क्रिकेटच्या कोणत्याही घटनेवर वादग्रस्त विधान करत सतत चर्चेत राहत असतो.

बांगलादेशचा माजी कर्णधार मोहम्मद अशरफुल याने देखील भारताविरुद्ध 2007 साली मिरपुर कसोटीत 26 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला होता. मधल्या फळीत खेळणाऱ्या या स्टायलिश फलंदाजाने बांगलादेश संघाकडून खेळताना काही विक्रम केले आहेत. कामगिरीत सातत्याने राखल्यामुळे हा खेळाडू संघाबाहेर पडला.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये अवघ्या 26 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. आपल्या धारदार गोलंदाजीने दिग्गज फलंदाजाची बोलती बंद करणाऱ्या या खेळाडूने फलंदाजीत देखील आपला जलवा दाखवला. दुखापतीमुळे शरीर साथ देत नसल्याने त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.