Fastest Century In IPL :आयपीएल मध्ये सर्वाधिक वेगवान शतक ठोकणाऱ्या खेळाडूंची ‘ही’ आहे यादी; यादीमध्ये एका भारतीय खेळाडूचा समावेश!

Fastest Century In IPL :आयपीएल मध्ये सर्वाधिक वेगवान शतक ठोकणाऱ्या खेळाडूंची 'ही' आहे यादी; यादीमध्ये एका भारतीय खेळाडूचा समावेश!

 Fastest Century In IPL: येत्या 22 मार्चपासून टाटा आयपीएल 2024 च्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. नव्या सीझनसाठी प्रत्येक खेळाडू विशेष तयारी करत आहे. टी20 मध्ये चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. गेल्या 15 मौसमात अनेक विक्रमांचा पाऊस पडलाय. क्रीडाप्रेमींचे भरपूर मनोरंजन करणारी ही लीग प्रचंड लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आज आम्ही या लेखामध्ये आपणाला आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या खेळाडूंची माहिती देणार आहोत. 

 Fastest Century In IPL :आयपीएलमध्ये सर्वांत जलद शतक ठोकणारे 4 खेळाडू..

 

View this post on Instagram

 

A post shared by Chris Gayle 👑 (@chrisgayle333)

1.ख्रिस गेल (Chris Gayle)

‘युनिव्हर्सल बॉस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलने  (Chris Gayle) आयपीएल मध्ये धमाका केला होता. आक्रमक फलंदाजी करून अनेक गोलंदाजाची त्याने पिसे काढली होती. क्रिकेट प्रेमींचे त्याने चांगलेच मनोरंजन केले होते. बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर अक्षरशा धावांचा पाऊस पडला होता. आयपीएल मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकवण्याचा पराक्रम त्याच्याच नावावर आहे. आयपीएल मध्ये अवघ्या 30 चेंडू त्याने शतक ठोकले होते. 2013 मध्ये पुणे वारियर्स इंडिया विरुद्ध खेळताना त्याने हे सर्वात वेगवान शतक ठोकण्याची किमया केली होती. त्याचा हा विक्रम गेल्या दहा वर्षापासून अबाधित आहे. आयपीएलच्या इतिहासात हे सर्वात वेगवान शतक ठरले.

ख्रिस गेल ने आयपीएल मध्ये केकेआर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्स इलेव्हन पंजाब या संघाकडून विविध मौसमात प्रतिनिधित्व केले होते. गेलने सर्वाधिक धावा बंगळूर संघाकडून खेळताना केल्या होत्या.

Fastest Century In IPL :आयपीएल मध्ये सर्वाधिक वेगवान शतक ठोकणाऱ्या खेळाडूंची 'ही' आहे यादी; यादीमध्ये एका भारतीय खेळाडूचा समावेश!

2. युसुफ पठाण  (Yusuf Pathan)

आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये एका भारतीय खेळाडूचा देखील समावेश आहे. आयपीएल युसुफ पठाण अनेक संघाकडून खेळला आहे. 2010मध्ये पठाणने अवघ्या 37 चेंडूत शतकी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाचा त्याने खरपूस समाचार घेतला होता. सुरुवातीच्या काळात आयपीएलमध्ये हे सर्वात वेगवान शतक ठरले होते मात्र त्याचा विक्रम नंतर ख्रिस गेलने मोडला. पठाण सुरुवातीच्या काळात राजस्थान रॉयल संघाचे प्रतिनिधित्व करत होता. नंतर केकेआर ने आपल्या गोटात त्याला सामील करून घेतले. मात्र पुन्हा तो राजस्थान रॉयल्स संघात दाखल झाला.

३.डेव्हिड मिलर david miller)

 

View this post on Instagram

 

A post shared by Dave Miller (@davidmillersa12)

आयपीएल मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर याचा देखील समावेश आहे. किलर मिलर या नावाने प्रसिद्ध असलेला डेव्हिड आयपीएल मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब या संघाचे प्रतिनिधित्व करतो. 2013 मध्ये त्याने बंगळूर रॉयल चॅलेंजर्स संघाची गोलंदाजी फोडून काढली. त्याची ही विस्मरणीय खेळी आज ही क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करून आहे. अवघ्या 38 त्याने विस्फोटक शतकी खेळी केली होती. मिलर सुरुवातीपासूनच पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करतोय. तो या संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे.

4.  ऍडम गिलक्रिस्ट  (adam gilchrist)

ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलक्रिस्ट याच्या नावावर सर्वात वेगवान आयपीएल शतक ठोकण्याचा विक्रम आहे. आयपीएलच्या पहिल्याच मौसमात त्याने अवघ्या 42 चेंडूत मुंबई इंडियन संघाविरुद्ध खेळताना दमदार शतकी खेळी केली होती. 2009 मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली हैदराबादने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत या नवीन खेळाडूचा समावेश, रोहित शर्मा आणि विराट कोहली नंतर येतो त्याचा नंबर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *