या गोलंदाजांनी पहिल्याच षटकात ‘हेट्रीक’ घेत विरोधी संघाचे कंबरडे मोडले होते, एकाने तर एकट्यानेच लावली होती संपूर्ण संघाची वाट..
क्रिकेट या खेळाची संपूर्ण दुनिया दिवानी आहे. देशातील सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाला पसंती देत आहेत. क्रिकेट चे वेड हे दिवसेंदवस वाढतच चालले आहे. अनेक लोक आपल्या आवडत्या खेळाडू ला सपोर्ट करत असतात.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या 2 खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी आपल्या पहिल्याच ओव्हर मध्ये हेट्रीक केली.

सध्या क्रिकेट मध्ये नवीन नवीन रेकॉर्ड हे तयार होत असतात आणि कोणता ना कोणता तरी खेळाडू हा जुने रेकॉर्ड तोडतच असतो यात काही वाद नाही. अशी क्रिकेट च्या दुनियेत असंख्य रेकॉर्ड आहेत पण आज या लेखात भारतातील जबरदस्त गोलंदाजी चे रेकॉर्ड सांगणार आहे.
चमिंडा वास :-
चमिंडा वास हे श्रीलंका देशातील खेळाडू आहेत. 14 फेब्रुवारी 2003 साली चमिंडा वास ने साऊथ आफ्रिका मध्ये बांगलादेश संघा विरोधात पहिल्याच ओव्हर मधील पहिल्या 3 बॉल मध्ये 3 खेळाडू बाद करून हॅट्रिक केली. नंतर 5 व्या चेंडूत सुद्धा एक विकेट घेतली होती चमिंडा वास ने एका ओव्हर मध्ये 4विकेट घेऊन आपल्या नावावर हा रेकॉर्ड नोंदवला. या सामन्यात चमिंडा वास ने 6 विकेट घेऊन अवघ्या 25 धावा दिल्या आहेत.
इरफान पठाण:-
इरफान पठाण हा भारतीय संघाचा माजी गोलंदाज होता. त्याचबरोबर इरफान पठाण फलंदाजी सुद्धा आक्रमक करायचा. 2006 साली सिरीज मॅच मद्ये शेवटच्या मॅच मध्ये राहुल द्रविड ने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला गोलंदाजी करण्याची संधी ही इरफान पठाण ला करण्यासाठी मिळाली.
यामध्ये ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर इरफान पठाणने सलमान बटला चा कॅच द्रविड च्या हातात देऊन झेलबाद केले. यानंतर इरफान पठाण ने युनूस खानला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि त्याच्या ओव्हरच्या पुढच्याच चेंडूवर मोहम्मद युनूसला बोल्ड केले. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये हट्रिक मारली.
हेही वाचा:
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..