ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
आयपीएल 2024 मधील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात किंग कोहलीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. टी 20 क्रिकेट मध्ये विराट कोहलीने सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम केला आहे. कोहली एक दिग्गज फलंदाज असल्यासोबत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे हे वेळोवेळी त्याने दाखवून दिले आहे.
पंजाब किंग्स या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जॉनी बेयरस्टो याच्या रूपाने पहिली विकेट गमावली. जॉनी हा मोहम्मद सिराजच्या चेंडूवर विराट कोहली कडून झेलबाद झाला. टी 20 क्रिकेट मधला विराट कोहलीचा हा 173 वा झेल होता. यासोबतच टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडणारा भारतीय खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर होता सुरेश रेनाने त्याच्या टी ट्वेंटी कारकिर्दीमध्ये 172 झेल पकडले होते तर मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांच्या नावावर 167 झेल घेण्याचा विक्रम आहे.
View this post on Instagram
विराट कोहलीने आयपीएल मध्ये आतापर्यंत 108 झेल पकडले आहेत. आयपीएल मध्ये सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. सुरेश रैनाने आतापर्यंत आयपीएल मध्ये 109 झेल पकडले आहेत. विराट कोहलीने आणखीन दोन झेल पकडले तर आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल पकडणारा खेळाडू होईल. सुरेश रैना आणि विराट कोहली यांच्यानंतर कायरान पोलार्ड यांनी आयपीएल मध्ये सर्वाधिक झेल पकडले आहेत. त्याच्या नावे आयपीएलमध्ये 103 झेल घेतल्याचा विक्रम आहे.
T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे भारतीय
-
173 झेल – विराट कोहली
-
172 झेल – सुरेश रैना
-
167 झेल – रोहित शर्मा
-
146 झेल – मनीष पांडे
-
136 झेल – सूर्यकुमार यादव
स्टार क्रिकेटपटू विराट कोहली यांनी आयपीएलच्या 17व्या हंगामातील चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात एका नव्या विक्रमाला गवसणी घातली होती. विराट कोहलीने टी 20 क्रिकेट मध्ये बारा हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू तर जगातला सहावा फलंदाज ठरला आहे. कोहलीने त्याच्या क्रिकेट कारकीर्दी मधील 377 व्या टी ट्वेंटी सामन्यांमध्ये हा कारनामा केला. यासोबतच त्याच्या नावे आठ शतके आणि 91 अर्ध शतकांची नोंद आहे. त्याच्या बॅट मधून 1074 तर 371 षटकार देखील निघाले आहेत.
टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारे खेळाडू
-
ख्रिस गेल (WI) – 463 सामने – 14562 धावा
-
शोएब मलिक (PAK)-542 सामने- 13360 धावा
-
कायरॉन पोलार्ड (WI)- 660 सामने- 12900 धावा
-
ॲलेक्स हेल्स (ENG)- 449 सामने- 12319 धावा
-
डेव्हिड वॉर्नर (AUS)- 370 सामने- 12319 धावा
-
विराट कोहली (IND)- 376 सामने- 12000 धावा
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.