अनेक लोक भारताला हिंदुत्वाची जन्मभूमी मानतात. जवळपास सर्वच मोठ मोठे हिंदू मंदिरे ही भारतात आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर भारतात नाही तर दुसऱ्या एका देशामध्ये स्थित आहे. होय, हे खरंय. जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर कंबोडियामध्ये आहे. या मंदिराचे नाव ‘अंगकोर वाट’ आहे. हे केवळ जगातील सर्वात मोठे मंदिर नाही तर ते जगातील (क्षेत्रफळानुसार) सर्वात मोठे धार्मिक स्थळ देखील आहे.
‘अंगकोर वाट’जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर
82,0000m2 परिसरात पसरलेले हे मंदिर 12 व्या शतकात खमेर राजा सूर्यवर्मन II याने यशोधरापुरा येथे बांधले होते. या मंदिराची वास्तू ख्मेर स्थापत्यकलेशी मिळते जुळते आहे. 3.5 किलोमीटर परिसरात पसरलेल्या या मंदिरात विविध देवी-देवतांच्या हजारो मूर्ती आहेत ज्या या मंदिराचे वैभव वाढवत आहेत. हे मंदिर जगातील सर्व धार्मिक स्थळांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे आहे.
पूर्वीचे ख्मेर राजे शैववादी असूनही, राजा सूर्यवर्मन यांनी विष्णू मंदिर बांधले आणि या मंदिराचे नाव ‘अंगकोर वाट’ ठेवले, म्हणजे ‘मंदिरांचे शहर’ आणि ते इतके मोठे आहे की ते खरोखरच ‘मंदिरांचे शहर’ आहे’ असे दिसते. हे मंदिर कंबोडिया देशाची ओळख बनले आहे आणि देशाच्या ध्वजावरही त्याची प्रतिमा आहे.
1986 ते 1992 पर्यंत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या मंदिराच्या जीर्णोद्धाराची जबाबदारी घेतली. अंगकोर वाटला 1992 मध्ये ‘जागतिक वारसा स्थळ’ घोषित करण्यात आले. अंगकोर वाट हे 1000 वर्षे जुने मंदिर आहे, जे आजपर्यंत संपूर्ण जगाला अभिमानाने दाखवत आहे.
—
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:- नादच खुळा! शार्दुल ठाकुरचा विकेट्सचा सिक्स 6 बॉल 6 बाद करून विरुद्ध संघाचा बाजार उठवला, वाचा सविस्तर.