Highest score in Ipl History: सनरायझर्स हैदराबादने आयपीएल मध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे सनरायझर्स हैदराबादने त्यांचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. सनरायझर्स हैदराबादने यावर्षी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना 20 षटकातील बाद 277 धावा केल्या होत्या. कालच्या बंगळूर विरुद्धच्या सामन्यात हैदराबादने 277 पेक्षाही अधिक धावा केल्या आहेत.
SRH vs RCB सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी पहिल्या षटकापासूनच तडाखेबाज फलंदाजी करण्यासाठी सुरुवात केली. हेड, अभिषेक शर्मा, एडन मारकरम अब्दुल समद आणि क्लासेन यांनी धडाकेबाज खेळी केल्यामुळे हैदराबादने 20 षटकात तीन बाद 287 धावा केल्या होत्या आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात इतकी मोठी धावसंख्या कोणत्या संघाला करता आली नाही ( Highest score in Ipl History)
आयपीएलमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या ( ( Highest score in Ipl History)
-
287/3 – सनराइजर्स हैदराबाद VS आरसीबी, बेंगलुरु, 2024
-
277/3 – सनराइजर्स हैदराबाद VS मुंबई इंडियंस, हैदराबाद, 2024
-
272/7 – कोलकाता नाइट राइडर्स VS दिल्ली कैपिटल्स, विशाखापट्टनम, 2024
-
263/5 – रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु VS पुणे वॉरियर्स, बेंगलुरु, 2013
-
257/5 – लखनऊ सुपर जायंट्स VS पंजाब किंग्स, मोहाली, 2023
-
248/3 – रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु VS गुजरात लायंस, बेंगलुरु, 2016
-
246/5 - सीएसके VS राजस्थान रॉयल्स, चेन्नई, 2010
ट्रॅव्हिस हेड ने सर्वाधिक धावा केल्या आहेत. हेडने 41 चेंडूत 102 धावा केल्या आहेत. यात नऊ चौकार आणि आठ षटकारांचा समावेश आहे तसेच अभिषेक शर्माने 34 तर हेन्रीक क्लासेन याने 31 चेंडू 67 धावा केल्या. ऍडन मारक्रम यांनी 17 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले तर अब्दुल समद याने 10 चेंडू 37 धावांची जबरदस्त खेळ करत तो नाबाद राहिला.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.