एशियन पेंट: इंग्रजांच्या काळात सुरु झालेल्या देशातील सर्वांत मोठी रंगाची कंपनी “एशियन पेंट” च्या सुरवातीची कहाणी अत्यंत रंजक आहे. एशियन पेंट देशातील सर्वांत मोठ्या रंगांच्या कंपन्यांपैकी आघाडीवर असलेली कंपनी. भारतात एकूण पेंट मार्केटच्या ५३% मार्केटवर एशियन पेंट्सच राज्य चालते. एवढच नाही तर ही आशियातील तिसरी सर्वांत मोठी रंग बनवणारी कंपनी आहे. तब्बल १६ देशात एशियन पेंट्सचे कारखाने लागले आहेत.
एशियन पेंट्स चा इतिहास ७८ वर्ष जुना म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरचा आहे. आज पाहूया ही कंपनी कश्या पद्धतीने भारतात पेंटची बादशाह बनली.
असी झाली होती एशियन पेंट्सची सुरवात…
एशियन पेंट्सचा इतिहास महात्मा गांधी यांच्या आंदोलनाशी जूळलेला आहे. जेव्हा एका बाजूला संपूर्ण देशातील लोकया आंदोलनात भाग घेत होते ,तेव्हा दुसऱ्या बाजूला ४ लोक मिळून या कंपनीची सुरवात करण्यात व्यस्त होते. त्या वेळी इंग्रजांनी विदेशातून देशात रंग आयात करण्यावर बंदी आणली होती.अश्यात लोकांसमोर मोजकेच असलेले काही जुने-पुराने रंग खरेदी करण्याशिवाय पर्याय नव्हता.
याच अडचणीच्या काळाला चंपकलाल चोकसी, चिमणलाल चोकसी , सुर्यकांत दानी आणि अरविंद वकील यांनी संधी समजून १९४२ मध्ये मुंबईत “एशियन पेंट्स एंड ऑईल प्रायवेट लिमिटेड” ची सुरवात केली.
सुरवातीच्या काळात कंपनीला लोकांपर्यंत पोहचवन्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांनी घरोघर जाऊन कंपनीबद्दल माहिती आणि रंगाचे छोटे छोटे पाकीट विकण्यास सुरवात केली. सुरवातीला अत्यंत कमी प्रतिसाद मिळालेली एशियन पेंट्स हि कंपनी नावाजली गेली ती म्हणजे १९५१च्या नंतर . कंपनीने १९५२ मध्ये तब्बल २३ करोड रुपयांचा व्यवसाय केला होता.
तेव्हा कंपनी फक्त पांढरा, काळा, पिवळा, लाल आणि हिरवा या ५ रंगाचं उत्पादन करत होती. त्या काळी ही रंगाच्या क्षेत्रातील खूप मोठी रक्कम होती.
लोकांच्या पसंतीस पडल्यानंतर कंपनीने ग्राहकांना टिकवण्यासाठी एक नवीन आयडिया शोधली होती. १९५४ मध्ये कंपनीने प्रसिद्ध कार्टूनकार आर. के. लक्ष्मण यांच्याकडून एक कार्टून काढून घेतले. आणि लोकांना याचे नाव ठेवण्याची स्पर्धा घोषित केली. लोकांनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत भाग घेतला होता.शिवाय याट जिंकणाऱ्या स्पर्धकाला ५०० रुपये बक्षिसही देण्यात आले होते. त्यांनी त्या कार्टूनला “मैस्कौट गट्टू” असे नाव ठेवले होते.
कार्टूननंतर कंपनीने आपला सर्वांत प्रसिद्ध डीस्टम्परला ट्रकटर नावाने जोडले आणि ” Don’t Lose Your Temper, Use Tractor Distemper” या लाईनसोबत मार्केटमध्ये आणले. हा डीस्टम्पर पाहता पाहता लोकांची पहिली पसंद बनला. त्यांतर कंपनीने महाराष्ट्रात आपला स्वतःचा रंगाचा कारखाना लावला.
१९६७ मध्ये एशियन पेंट्सने विदेशात पहिला प्लांट लावला.
१९५७-६७ मध्ये कंपनीने अनेक विदेशी कंपन्यांसोबत काम केले. एकापाठोपाठ मिळणाऱ्या यशामुळे कंपनीचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी सर्वप्रथम १९६७ मध्ये विदेशात आपला पहिला प्लांट लावण्यचा निर्णय घेतला. अश्या पद्धतीने हळूहळू मुंबईच्या गल्लीबोळातून निघून कंपनीने विदेशात आपल्या कीर्तीचा डंका वाजवला.
आज एशियन पेंट्स हजारो रंग, थीम, टेक्स्चर आणि शेडच्या कलरचा व्यवसाय करत आहे. यात स्वस्तापासून- महाग सर्व प्रकारच्या रंगांची निर्मिती होते. भिंतीपासून ते लाकडांना दिल्या जाणाऱ्या रंगांपर्यंत आज कंपनीचे उत्पादन वाढले आहे.
एशियन पेंट्सच्या यशाचे सर्वांत मोठे रहस्य म्हणजे वेळेसोबत चालणे हे आहे. कंपनीने क्वालिटीसोबतच मार्केटमधील वेळेनुसार चालणाऱ्या आणि बदलणाऱ्या ट्रेंडवर आपली मजबूत पकड बनवली आहे.
मग गोष्ट रंगांसाठी बनवण्यात आलेल्या पहिल्या कमर्शियल जाहिरातीसाठी असो अथवा कंपनीच्या वेबसाईटबद्दल. नेहमी कंपनी वेळेच्या सोबत आणि कधीकधी तर व वेळेच्याही पुढे असते.
सद्य घडीला एशियन पेंट्स फेसबुक,ट्वीटर , युट्यूब सारख्या सोशल मिडियावरती सुद्धा सक्रीय आहे. येथे कंपनीचे लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स आहेत.
२००४ साली एशियन कंपनीची forbes च्या “Best Under A Billion Compnies”यादीत सुद्धा निवड झाली होती.
शिवाय British Safety Councilने SwordOf Honourया पुरस्काराने सन्मानित केले होते.
एशियन कंपनी देशाच्या त्या मोजक्या पेंट्स कंपन्यांपैकी एक आहे ज्यांची सुरवात स्वांतत्र्य भारताच्या अगोदर झाली होती आणि त्या आज सुद्धा सक्रीय आहेत. तसेच रंग क्षेत्रात जगभरातील सर्वांत गाजलेल्या कंपन्यांपैकी एक नाव हे एशियन पेंट्स आहे.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.