अखंड भारतावर इंग्रज, पोर्तुगीज अणि अन्य काही विदेशी लोकांनी सर्वप्रथम व्यापाराच्या माध्यमाने आपली पकड बनवली अणि नंतर आपल्या राजनीतीच्या अणि सैन्य बळाच्या सहाय्याने आपली सत्ता स्थापित केली. इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारताच्या अनेक भूखंडावर जाट क्षत्रिय, राजपूत, सिख, मराठे आणि काही दक्षिनी शासकांचे अधीपत्य होते. पश्चिमेला सिंध, बलुचीस्तान, पंजाब, हिंदुकुश, मुलतान इत्यादी ठिकाणी इस्लामी सत्ता स्थापन झाली होती. दिल्ली, बंगाल, मैसूर सारख्या हिंदू लोकसंख्या जास्त असलेल्या भागातही मुस्लिम राज्यकर्त्यांची सत्ता होती, ज्यांना सतत मराठे, राजपुत सिख अणि अन्य काही दक्षिणात्य राज्यांशी युद्ध करावे लागत असे.
इंग्रजांनी मुस्लिमांसोबत मिळून भारताची सत्ता क्षत्रिय, मराठे, सिख यांच्याकडून बळकावली होती, परंतु सर्वत्र केवळ प्लासीची लढाई अणि मैसूर युद्धाचीच चर्चा जास्त केली जाते. केवळ या दोन युद्धाच्या सहाय्याने हे दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो की, मुस्लिम राज्यांनी इंग्रजांसोबत युद्ध केले होते. परंतु इतिहासातील सत्य परिस्तिथी सांगितल्यामुळे विवाद निर्माण होऊ शकतात.
एक वेळ अशी होती जेंव्हा राजपुत, मराठा अणि सिखांनी मिळून इंग्रजांना सळो की पळो करून टाकले होते. तेंव्हा इंग्रजांना मदत ही मुस्लिम राज्यकर्त्यांनी केली होती. नंतर एक वेळ अशीही आली जेंव्हा इंग्रजांनी मुस्लिम शासकांसोबत लढण्यासाठी राजपुत अणि शिखांना आपल्या सोबत घेतले होते. अशा प्रकारे इंग्रजांनी दोन्ही पक्षांना आपल्या फायद्यासाठी वापरून घेतले होते.
इंग्रजांनी हिंदूंनां भडकावण्यासाठी असा प्रचार केला की, जर इंग्रज भारत सोडून गेले तर मुस्लिम हे परत पूर्वीसारखे त्यांच्यावर अत्याचार करतील अणि मुस्लिमांना भडकावण्यासाठी असा प्रचार केला की, आम्ही भारत सोडून गेलो तर हिंदू हे त्यांच्या पूर्वजांचा सूड हा त्यांच्याकडून घेतील. इंग्रजांनी लिहिलेल्या इतिहासामुळे आजही भारतातील लोकं आपापसात लढतात, परंतु सत्य काय आहे हे कोणीही जाणून घेत नाही. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, या सर्व गोष्टींना जबाबदार असणाऱ्या इंग्रजांना भारतात कोण घेऊन आले होते?
ईस्ट इंडिया कंपनीला 1600 मध्ये ब्रिटनच्या शाही अधिकार पत्रामुळे व्यापार कारण्याची परवानगी मिळाली होती.
हि कंपनी लंडणच्या व्यापाऱ्यांची होती ज्यांना पूर्वेकडे व्यापार करण्याचा अधिकार मिळाला होता.
पूर्व भारतात इ.स 1615-1618 या दरम्यान सम्राट जहांगीर याने ईस्ट इंडिया कंपनीला विशेष अधिकार देऊन भारतात व्यापार करण्याची मुभा दिली होती. दुसरीकडे दक्षिण भारतात इ.स 1640 मध्ये विजयनगर च्या शासकांनी या कंपनीला चेन्नईच्या एका ठिकाणी कारखाना सुरु करण्याची परवानगी दिली होती. ईस्ट इंडिया कंपनीने याठिकाणी लागलीच सेंट जॉर्ज किल्याची निर्मिती केली अणि व्यापारासोबत रणनीती आखन्यास सुरुवात केली.
1661 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला आणखी एक संधी मिळाली, यावेळी त्यांनी मुंबईच्या एका बेटावर ताबा मिळवला होता. (ब्रिटनचा राजा चार्ल्स द्वितीयला त्याच्या लग्नात भेट म्हणून मुंबईतील एक बेट भेटले होते. चार्ल्सने 1667 मध्ये हे बेट केवळ 10 पाउंड प्रतीवर्षे याप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनीला किरायाने दिले होते.) 1669-1677 यादरम्यान कंपनीचे गवर्नर जेराल्ड अंगियर याने आधुनिक मुंबई नगराचा पाया रचला. पुढे चालून हेच शहर त्यांच्या व्यापार अणि युद्धाचा बालेकिल्ला बनले होते.
इंग्रजांना भारतात व्यापार करण्याची परवानगी ही सर्वप्रथम जहांगीरने दिली होती, यामागे जहांगीरची वेगळीच राजणिती होती. जहांगीर अणि इंग्रजांनी मिळून 1618 पासून 1750 पर्यंत भारतातील अधिकांश हिंदू राजवाड्यांना कपटगिरीने आपल्या ताब्यात घेतले होते. त्यावेळी बंगाल मध्ये त्यांना ताबा मिळवता आला नाही. बंगलमध्ये नवाब सिराजुद्दौला याची सत्ता होती. शेवटी 1757 मध्ये या नवाबलाही हरवण्यात त्यांना यश आले. (सिराजुद्दौला अणि इंग्रजामध्ये झालेल्या या युद्धालाच प्लासीची लढाई असेही म्हणतात.)
प्लासीची लढाई ही 23 जून 1757 ला मुर्शीदाबादच्या दक्षिणेस नादिया जिल्ह्यातील प्लासी नामक ठिकाणी झाली होती. या युद्धात एकीकडे ईस्ट इंडिया कंपनीची सेना होती तर दुसरीकडे नवाब सिराजुद्दौला याचे सैन्य. ईस्ट इंडिया कंपनीच्या सेनेने रोबर्ट कलाईव्ह याच्या नेत्रात्वाखाली नवाब सिराजुद्दौलाच्या सैन्याचा पराभव केला होता.
शेवटी ज्याने त्यांना भारतात आणले त्यांनाही इंग्रजांनी सोडले नाही. मुघलांच्या लोकांना त्यांनी धोका देऊन त्यांचीही सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती.
भारतावर ब्रिटनची व्यपारीक अणि राजनीतिक दोन्हीही प्रकारे सत्ता होती. 1857 पासून सुरु झालेली त्यांची राजनीतिक सत्ता ही 1947 मध्ये संपूस्टात आली होती. जवळपास 100 वर्ष त्यांनी भारतावर राज्य केले होते.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिर भारतात नाही तर ‘या’ देशात उभारलं गेलंय..
हे ही वाचा:- नादच खुळा! शार्दुल ठाकुरचा विकेट्सचा सिक्स 6 बॉल 6 बाद करून विरुद्ध संघाचा बाजार उठवला, वाचा सविस्तर.